DNA Live24 2015

कापडी पिशव्यांचे वाटप करुन प्लॅस्टिक मुक्तीचा संदेश

अहमदनगर :
पर्यावरणास घातक ठरत असलेल्या व राज्य सरकारने बंदी टाकलेल्या प्लॅस्टिक पिशव्या हद्दपार करण्याच्या हेतूने नेहरु युवा केंद्र संलग्न स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील ग्रामस्थांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाने स्वच्छता हीच सेवा या उपक्रमाचा समारोप झाला. नवनाथ विद्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्तात्रय जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून प्र.मुख्यध्यापक किसन वाबळे, डोंगरे बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, काशीनाथ पळसकर, निळकंठ वाघमारे, गोविंद बोरुडे, चंद्रकांत पवार, उत्तम कांडेकर, नवनाथ होले, शुभांगी धामणे, मंदा साळवे, मयुर काळे, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे, अक्षय चौधरी, दिनेश गायकवाड, दामोदर ठाणगे, अक्षय कदम, भाऊसाहेब कदम, संजय पुंड, मंदाताई डोंगरे, भागचंद जाधव, अनिल कापसे, रंगनाथ शिंदे, राष्ट्रीय कुस्तीपटू प्रतिभा डोंगरे, प्रियंका डोंगरे, लहानू जाधव, तुकाराम खळदकर आदी उपस्थित होते.  

प्लॅस्टिक मुक्तीचा संदेश देत उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते ग्रामस्थांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांचे विचार अंगीकारण्याचे सांगितले. दत्तात्रय जाधव यांनी प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असून, प्लॅस्टिक पिशव्या न वापरण्याचा निर्धार प्रत्येकाने करण्याची गरज असल्याचे सांगितले. पै.नाना डोंगरे यांनी सार्वजनिक स्वच्छता व प्लॅस्टिक बंदीसाठी स्वत: पासून सुरुवात करण्याची गरज आहे. शालेय विद्यार्थी व युवकांनी पुढाकार घेतल्यास बदल घडणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या उपक्रमास नवनाथ विद्यालय व निमगाव वाघा ग्रामपंचायतीचे सहकार्य लाभले. तर  नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक बाबाजी गोडसे व ग्रामसेविका अंजुम शेख यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन काशीनाथ पळसकर यांनी केले. आभार किसन वाबळे यांनी मानले.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget