DNA Live24 2015

सरकारच्या फसव्या धोरणांच्या निषेधार्थ धरणे व मौनव्रत

अहमदनगर :
केंद्र व राज्य सरकारच्या फसव्या धोरणांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी यांच्या वाडियापार्क क्रीडा संकुल येथील पुतळ्या समोर धरणे आंदोलन करुन मौनव्रत धारण करण्यात आले.

प्रारंभी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या आंदोलनात आ.अरुणकाका जगताप, आ.संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, संदीप वर्पे, विनित पाऊलबुध्दे, किसनराव लोटके, संजय सपकाळ, अरविंद शिंदे, श्यामचंद्र दिघे, अमित खामकर, अभिजीत खोसे, दिलदारसिंग बीर, लहू कराळे, अन्सार सय्यद, योगेश नेमाने, तुषार टाक, स्वप्निल गायकवाड, मोहन कदम, उमेश क्षीरसागर, मिलिंद अनाप, प्रकाश भागानगरे, लकी खुबचंदानी, संपत बेरड, बाबासाहेब चव्हाण, मच्छिंद्र बेरड आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सत्ताधार्‍यांच्या फसव्या धोरणांनमुळे आर्थिक, सामाजिक परिस्थिती खालावली आहे. तसेच राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. भाजपच्या प्रतिगामी धोरणांमुळे महात्मा गांधींनी मिळवून दिलेले स्वातंत्र्य, लोकशाही व संविधानिक सार्वभौमत्व धोक्यात आले आहे. सध्याची स्थिती हे लोकशाहीसाठी घातक असून, देशातील कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पत्रकार परिषद घेऊन आपली भीती व्यक्त करत आहेत. देशात व राज्यात संघ स्थितीत समता, बंधुत्व, धर्मनिरपेक्षता या संविधानिक तत्त्वाची पायमल्ली होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आला आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget