DNA Live24 2015

बीटी कंपन्यांना बाराशे कोटींचा दंड..!

मुंबई :
मागील वर्षी बिजी 2 बियाणे वापरलेल्या शेतात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यात राज्याचे सुमारे 2200 शकोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. त्यापोटी नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी कृषी विभागाने कंपन्यांना बाराशे कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

बीजी थ्री बियाण्यास परवानगी नाकारल्याने शेतकऱ्यावर सोळा वर्षानंतर पुन्हा बोंड अळीचे संकट कोसळले आहे. त्याचवेळी शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान नाकारताना स्वदेशीचा नारा देत कृषी विभागाने ही जबाबदारी कंपन्यांवर टाकली आहे. याप्रकरणी कंपन्यांनी न्यायालयात जाण्याचा आधीच निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी या न्यायालयीन प्रक्रियेची वाट पाहावी लागणार आहे. अशा वेळी शेतकऱ्यांना नुकसान थेट भरपाई देण्याऐवजी कंपन्यांकडे बोट दाखवत राज्य सरकारने ही जबाबदारी झटकली आहे. बोंडअळीचे अनुदान तातडीने मिळण्याची मागणी होत आहे. त्यासाठी शेतकरी संघटना आंदोलन करीत आहेत. अशावेळी हा निर्णय झाल्याने आता हे अनुदान लवकर मिळणार याकडे लक्ष लागले आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget