DNA Live24 2015

गांधी जयंतीला राज ठाकरे यांचा सरकारला कुंचला टोला..!

मुंबई :
सुप्रसिद्ध कार्टुनिस्ट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महात्मा गांधी जयंतीला विशेष कार्टुन प्रसिद्ध केले आहे. 'सुटपासून कपडे' तयार करण्याऐवजी 'कापड्यापासून सूत' करणारे केंद्र सरकार त्यात दाखविले आहे.

आपल्या कार्टुनद्वारे राजकीय व सामाजिक विरोधाभासी विचारांवर राज ठाकरे कोरडे ओढतात. आताही अच्छे दिनचे स्वप्नरंजन करून भारतीयांना भुलविणाऱ्या पंतप्रधान नरेन्द्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या ग्रुपला त्यांनी लक्ष्य केले आहे. महात्मा गांधी जयंतीच्या कार्टुनमध्येही त्यांनी मोदी सरकारच्या धोरणांमुळे कसे सामान्य भारतीयांचे कपडे उतरविले जात आहेत, याकडे लक्ष्य वेधले आहे.

देशातील आर्थिक व राजकीय गोंधळात हिंदुस्थान कसा नागविला जात आहे, हेच त्यांनी कुंचल्यातून चितारले आहे. उलट्या मार्गाने देशाचा विकास करण्याचा हा प्रयत्न आत्मघातकी असल्याचे दाखवून देण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय. हे कार्टुन सोशल मीडियावर जोरात ट्रेंडमध्ये आहे.
Labels:

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget