DNA Live24 2015

शालेय शिक्षण मंत्र्यांची शिष्टमंडळाने घेतली भेट

अहमदनगर :
मागील काही वर्षापासून शासनामार्फत पहिली ते आठवी पर्यन्तच्या वर्गांची संकलित व पायाभूत चाचणी परिक्षाचे आयोजन केले जात आहे. परंतु त्यामध्ये अनेक त्रुटी असल्याने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात शिक्षणमंत्री विनोद तावडे व संचालक मगर यांची भेट घेतली.

यावेळी शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणुनाथ कडू, शिक्षक आमदार नागो गाणार, शिवाजी सागडे, रखमा ढोणे, लक्ष्मण वालगुडे, शशी चौधरी, भामरे पाटील यांनी सदर प्रश्‍नावर चर्चा केल्याची माहिती शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

शिष्टमंडळाने संकलित व पायाभूत चाचणी परिक्षेसंदर्भात शिक्षणमंत्री तावडे यांच्याशी प्रत्येक मुद्यांवर सविस्तर चर्चा केली. त्यात आरटीई अ‍ॅक्ट प्रमाणे इयत्ता पहिली ते आठवीच्या प्रश्‍नपत्रिका काढणे व मूल्यमापन करणे हा सर्वस्वी आधिकार शाळांचा आहे. त्यामुळे पायाभूत व संकलित चाचणी परिक्षा पूर्वीप्रमाणे घेण्याचा आधिकार शाळांनाच असावा हे निदर्शनास आणून देण्यात आले. यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी संकलित व पायाभूत चाचण्यांबाबत पुनर्विचार करून दोन दिवसात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले असल्याचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी सांगितले.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget