DNA Live24 2015

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण गोंधळ


अहमदनगर :
भटके जमातींच्या केंद्र व राज्यस्तरावरील विविध मागण्यांसाठी भटके विमुक्त हक्क परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर जागरण गोंधळ घालून धरणे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात परिषदेचे अध्यक्ष धनंजय ओबासे, पुरुषोत्तम काळे, वसंत गुंजाळ, साहेबराव गोसावी, सुपडू खेडकर, अशोक गिरी, शिवदास वाघमोडे, गोपीचंद इंगळे, शिवाजी पोटे, संजय सावंत, मोहन शेंगर, गोविंद तांदळे, उत्तम सावंत, भीमराव इंगोले, प्रतीक गोसावी, मनोज मकवाना, बाबुराव शिंदे, उत्तम सावंत, संदीप गोसावी, अशोक साळवे, सुनील वाकडे, राकेश तमायचेकर, रामकृष्ण मोरे, संदीप चव्हाण, रवींद्र गोसावी आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

स्वातंत्र्य प्राप्तीपासून भटके विमुक्तांच्या अनेक प्रश्‍न प्रलंबित आहे. आजही हा समाज विकासाच्या व शिक्षणाच्या प्रवाहापासून लांब आहे. भटकंतीचे जीवन जगून पालामध्ये गावकुसाबाहेर वास्तव्यास आहे. शासनाच्या या समाजासाठी काही योजना जाहिर झाल्या असून, मात्र त्या तळागाळा पर्यंन्त मुख्य लाभार्थी पर्यंन्त पोहचलेल्या नाहीत. योजनेच्या जाचक अटीमुळे त्यांना लाभ घेता येत नाही. पारंपारिक व्यवसाय बुडाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. मुलभुत हक्क व अनेक लाभांपासून वंचित असणारा हा समाज आहे. भटकंती करणार्‍या या समाजातील अनेकांची क्रूरतेने हत्या करण्यात आली आहे. 

दादा इदाते घुमंतू अर्ध घुमंतू जनजाति आयोगाच्या शिफारशी त्वरीत लागू कराव्यात, एस.सी. एस.टी.च्या भटके विमुक्तांसाठी स्वतंत्र तिसरी सूची व कायमस्वरूपी आयोगाला घटनात्मक दर्जा द्यावा, अ‍ॅट्रॉसिटी कायदा भटक्या विमुक्तांना त्वरित लागू करावा, बार्टीच्या धरतीवर भटके विमुक्त समाज संशोधन व संवर्धन संस्थेची निर्मिती करण्यात यावी,  क्रिमिलेअरची अट सरसकट रद्द करण्याची मागणी केंद्र सरकार स्तरावर करण्यात आली आहे. तसेच राज्य सरकारकडे  दुर्लक्षीत भटके विमुक्त समाजाचे शासकीय पातळीवर सर्व्हेक्षण करावे, सामाजिक पुनर्वसन व्हावे, भटके विमुक्तांवर झालेल्या अमानुष हत्या व अन्यायाची पुनरावृत्ती थांबविण्यासाठी समाजाला सुरक्षेची हमी मिळावी आदिंसह 12 मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे. 

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget