DNA Live24 2015

नगर जिल्ह्यात केवळ ६९ टक्के पाऊस..!

अहमदनगर :
जिल्‍हयात आतापर्यत सरासरीच्‍या केवळ 69.32 टक्‍के इतका पाऊस झाला आहे. सर्वच ठिकाणी पावसाची सरासरी कमी आहे. प्रत्‍येक तालुक्‍यात पावसाने मोठा खंड दिला आहे. गेल्‍या तीन वर्षाच्‍या तुलनेतही या वर्षी पाऊस कमी आहे. त्‍यामुळे या टंचाई परिस्थितीचा समाना करण्‍यासाठी आपण आतापासूनच नियोजन करणे गरजेचे आहे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

सध्‍या जिल्‍हयातील 868 गावांमधील भूजल पातळी मागील पाच वर्षाच्‍या तुलनेत किमान एक ते कमाल 3 मीटरने घटली आहे. काही गावात 3 मीटरपेक्षाही जास्‍त घट भूजल पातळीत झाली आहे. त्‍यामुळे आगामी काळात टंचाईचा सामना करावा लागू शकतो. हे पाहता जिल्‍हयातील विविध प्रकल्‍पातील पाणी साठा आरक्षित करण्‍याच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या आहेत. सर्व संबंधित यंत्रणांनी ही कार्यवाही तात्‍काळ करावी असे निर्देश पालकमंत्री राम शिंदे यांनी दिले आहेत.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget