DNA Live24 2015

भुजबळांचा आठवलेंना टोला..!

राजकारण म्हटलं की टोलवाटोलवी आलीच. लासलगाव येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे दोघेही  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यातही अशीच जोरदार टोलेबाजी झाली आणि उपस्थितांच्या कानाचे पारणे फिटले.

यावेळी महाविद्यालयीन व्यासपीठाचे राजकीय व्यासपीठावर नकळत रूपांतर झाले. आठवलेंनी नेहमीप्रमाणे थेट टीका न करता "मोदीजी व मी चांगले बॅटस्मन असुन, आम्ही चौकार, षटकार ठोकतो. आगामी निवडणुकीसाठी आमचा सराव चालू आहे" असं म्हणत आपल्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही कौतुक करून घेतले. तसेच "भुजबळ माझे चांगले मित्र आहेत" असे सांगताना मित्रप्रेम दाखवून दिले. सोबतच बहुजन समाजाला पुढे नेण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुकही केले.

पण आठवलेंची बॅटींग भुजबळांना झोंबल्यामुळे त्यांनी जोरदार टोलेबाजी करीत आपणही कच्चे खिलाडी नसल्याचा पुन्हा एकदा प्रत्यय दिला. ते म्हणाले की, "चांगल्या फलदाजांला बाद करण्यासाठी आमच्याकडे चांगले गोलंदाज आहेत." त्यांचा या राजकीय खेळीचा आनंद  प्रेक्षकांनी पोटभर हसत घेतला. त्यानंतर भुजबळांनी आरक्षण आणि विद्यार्थी शिक्षण या बाबतीत काही प्रश्न उपस्थित केले. त्या प्रश्नांवर उपाय करावे अशी मागणी आठवलेंकडे केली.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget