DNA Live24 2015

दुष्काळाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांना ठाकरी फटकारा..!

मुंबई :
राज्यावर दुष्काळाचे ढग दाटले असतानाही आपले मुख्यमंत्रीपद पुढचे सहा वर्षे शाबीत राहण्याबद्दल भाष्य करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठाकरी फटकारा बसला आहे. आपल्याच मस्तीत राज्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून मुख्यमंत्री दिवास्वप्न पाहत असल्याचे राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून सूचित केले आहे.

पक्षांतर्गत आणि इतर पक्षातील राजकीय विरोधकांना झटका देण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी वेगळी इमेज प्रस्थापित केली आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी इतरांना त्यांची जागा दाखविण्यासाठी म्हणून 'पुढचा मुख्यमंत्री मीच राहणार..' असे म्हणून खिजविले होते. मात्र, राज्यात दुष्काळ आणि इतर समस्यांचा आगडोंब उसळलेला असताना आणि विकासाला ब्रेक लागलेला असताना मुख्यमंत्री असे कसे बोलतात, असा प्रश्न विचारी समाजास पडला होता. तेच हेरून मनसेचे प्रमुख आणि सुप्रसिद्ध कार्टूनिस्ट राजसाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना नवे कार्टून भेट दिले आहे. राज्यभरात हे कार्टून जोरात शेअर होत आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget