DNA Live24 2015

अबबब...पहाटे कडक थंडी...दुपारी कडक ऊन..!

नवरात्रोत्सवात सांगलीकरांनी अनुभवली निसर्गाची किमया.

सांगली शहर आणि परिसरात शुक्रवारी पहाटे दाट धुक्याची चादर पसरली होती. नवरात्रोत्सवातील शुक्रवार असल्याने दर्गामाता मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांची गर्दी मोठी होती.

नवरात्र म्हटली कि पहाटे देवीला जाऊन दर्शन घेणे आलेच. पंचक्रोशीतील जवळच्या देवीच्या ठाणावर पायी जाणे, पहाटेची थंडी, दिवसाची सुरुवातीला दिसणारे देवीचे प्रसन्न रूप, प्रवासात होणार्या गप्पा हे सगळ अविस्मरणीय असत. हा कितीतरी वर्षांचा नवरात्रीचा दिनक्रम ठरलेला आहे. प्रवासात हवीहवीशी वाटणारी थंडी आणि दाट धुके असेल तर...तर तन प्रसन्न, मन प्रसन्न, दिवसही प्रसन्न.

असाच अनुभव सध्या सांगलीकर घेत आहेत. तिथे सकाळी आठपर्यंत धुके दिसत आहेत. देवीच्या दर्शनाला जाणारे भक्त, शाळकरी मुले याचा एकाच वेळी आनंद घेत आहेत आणि थोडा त्रास सहन करत आहेत. त्यांना दाट धुक्यातून वाट शोधावी लागत आहे. आठ वाजल्यानंतर त्यांना सूर्यदर्शन होत आहे.

निसर्गाची किमया सांगलीकर दोन दिवसांपासून अनुभवत आहेत.पहाटे थंडी आणि दाट धुके, साधारण आठला सूर्यदेवाचे दर्शन आणि दुपारी कडक ऊन अशी अवस्था आहे.

आता हा दाट धुके आणि कडक उन्हाचा खेळ ४ दिवस संपणार असाच चालेल  असे भारतीय हवामान खात्याचे म्हणणे आहे.
Labels:

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget