DNA Live24 2015

तृतीय पंथीयांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

अहमदनगर :
तृतीय पंथीयांवर झालेल्या जीवघेणा हल्ल्याचा निषेध व्यक्त करून, तृतीय पंथीयांना संरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी तृतीय पंथीय कल्याणकारी संस्थेच्या वतीने जिल्हाध्यक्ष काजल गुरु यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आरोपींना अटक न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा तृतीय पंथीयांनी दिला आहे.

मोर्चाची सुरुवात तारकपूर येथून झाली. शहरातील प्रमुख मार्गावरुन मार्गक्रमण करीत तृतीयपंथीयांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. हल्लेखोरांवर कारवाई करून तृतीय पंथीयांना न्याय मिळवून देण्यासाठी जोरदार निदर्शने करण्यात आली. या मोर्चात तमन्ना शेख, लैला शेख, रिटा गुरु, आयेशा शेख, दिशा, शीला, शंकर, रशीद शेख, नूरजहान, मुस्कान, सना, आशू, छकुली, मोगली, धनश्री, उषा, गौरी आदींसह नगर शहरातील व श्रीरामपुर मधील तृतीय पंथीय सहभागी झाले होते.

जिल्हाध्यक्ष काजल गुरू व हाजी पिंकी गुरु शेख यांच्यावर दि.22 सप्टेंबर रोजी श्रीरामपूर येथे आझाद मैदान मेन रोड येथून गणपतीची आरती करून येत असताना हॉटेल निलायम जवळ अज्ञात गुंडांनी मोटरसायकलवर येऊन धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात काजल गुरु वाचवले तर हाजी पिंकी गुरु यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तृतीय पंथीय समाजातील एक घटक असून, त्यांच्यावर कट रचून हल्ले होत आहे. अनेक उत्सव व आनंदाच्या समारंभात तृतीय पंथीय सहभागी होत असतात. तृतीय पंथीयांना अशा समाजकंटकांपासून जीवितास धोका निर्माण झाला असून, त्यांना संरक्षणाची गरज असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
तृतीय पंथीयांना पोलीस संरक्षण मिळावे, वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी प्रशासनाकडून अनुदान उपलब्ध व्हावे व हल्लेखोरांना अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार माधुरी आंधळे यांना देण्यात आले. 

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget