DNA Live24 2015

लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळ हद्दपार करणार : मुख्यमंत्री

लातूर :
जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून राज्यात जलसंवर्धनाची मोठी चळवळ उभी राहिली आहे. आता भारतीय जैन संघटना आणि राज्य शासनाच्या एकत्रित प्रयत्नातून लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यातून दुष्काळ कायमस्वरूपी हद्दपार करणार, भूकंपग्रस्तांच्या नव्याने निर्माण झालेल्या समस्या सोडविणार असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्लारी येथे दिला.

महाराष्ट्र शासन व भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर आणि उस्मानाबाद जिल्हा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याच्या निर्धार समारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, उस्मानाबादचे पालकमंत्री अर्जुन खोतकर, खासदार डॉ.सुनील गायकवाड, खासदार, प्रा. रविंद्र गायकवाड, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी मंत्री डॉ.पदमसिंहजी पाटील, माजी मंत्री तथा आमदार मधुकरराव चव्हाण, आमदार सर्वश्री. अमित देशमुख, बसवराज पाटील, सर्वश्री आमदार राणा जगजितसिंह पाटील, त्र्यंबक भिसे, सुधाकर भालेराव, विनायकराव पाटील, सुरजितसिंह ठाकूर, विक्रम काळे, सुरेश धस, लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलींद लातूरे, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, माजी खासदार गोपाळरावजी पाटील, जनार्धन वाघमारे, रुपाताई निलंगेकर, कल्पना नरहिरे, मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, लातूरचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे , मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन इटनकर, संजय कोलते, लातूरचे पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक आर. राजा उपस्थित होते.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget