DNA Live24 2015

'तो' विश्वास होता म्हणून दिली मोठी आश्वासने; गडकरींची गांधींवर टीका

दिल्ली :
आम्ही सत्तेत कधीही येऊ शकणार नाही, असा आम्हाला पूर्ण विश्वास होता. यासाठी आम्हाला मोठ-मोठी आश्वासने देण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्याबद्दल ज्या कार्यक्रमात मी काही बोललो, तो कार्यक्रम मराठी भाषेत होता. मग मला आश्चर्य वाटते, की राहुल गांधी यांना मराठी कधीपासून कळायला लागलं, असा टोला मारून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपली आणि भाजप सरकारची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला आहे.

ते म्हणाले की, मी पंतप्रधान मोदीजी किंवा 15 लाख रुपयांच्या आश्वासनाबाबत काहीही बोललेलो नाही. राहुलजींनी मराठी समजण्यास सुरवात केली असल्यास हरकत नाही. त्यांनी मराठी शिकून घ्यावं. आम्ही निवडणुकीत दिलेली आश्वासने आम्ही पूर्ण केली आहेत. कार्यक्रमात भाजप किंवा मोदींचे नाव घेतले नाही. प्रसिद्ध झालेली ती एक टेबल न्यूज होती. मी कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

अशा पद्धतीने गडकरी यांनी आता आपलाच मुलाखतीमधील वाक्यांपासून फारकत घेत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget