DNA Live24 2015

मुख्यमंत्र्यांसमवेतच्या प्रवासाने खडसे यांना बळ..!

जळगाव :
दिवंगत माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर भाजपमधील सर्वाधिक पॉवरफुल नेता म्हणून माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची ओळख होती. मात्र, एकेकाळची ही ओळख आता इतिहासातूनही हद्दपार झाली आहे. त्यामुळेच त्यांना फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातूनही बाहेर व्हावे लागले आहे. त्यामुळेच त्यांच्या पक्ष सोडण्याबद्दल वावड्या उठू लागलेल्या आहेत. अशावेळी त्यांना पुन्हा इन करून घेतले जाते की काय, अशीही चर्चा सुरू झाली आहे. त्यास निमित्त ठरले आहे मुख्यमंत्र्यांच्या जळगाव दौऱ्याचे...

आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खडसे यांना पुन्हा एकदा आपलेसे करून घेण्यासाठी भाजप विचार करीत असल्याचे चित्र आहे. परवा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नामकरण कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे एकाच गाडीतून आले. मात्र, तत्पूर्वी झालेल्या महत्वाच्या बैठकीला खडसे गैरहजर असल्याने राजकीय वर्तुळात विविध अंदाज बांधले जात होते. मात्र, या एकाच एकत्र प्रवासाने या अंदाजाना छेद दिला आहे.

आगामी निवडणुकीसाठी खडसेंसारख्या जाणकार नेत्याविना निवडणुक लढविणे फडणवीस सरकारला डोईजड होईल. निवडणुकीला खडसेंची मदत महत्वाची आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा मंत्रीमंडळात घेणार अशा चर्चा चालू आहेत. त्यांना जर मंत्रीमंडळात पुनरागमन करवून घ्यायचे असेल तर ज्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात खडसे सापडले त्या प्रकरणात क्लीनचीट देणे गरजेचेच आहे. आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब क्लीनचिट मास्तर म्हणूनच ओळखीचे झाले आहेत. अशावेळी खडसे साहेबांचा मार्ग नक्कीच सुकर होणार याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक भावना आहे.

...तरी खडसे साहेब किती रमतील?
मुख्यमंत्र्यांचे लाडके मंत्री गिरीश महाजनांशी खडसे साहेबांचे राजकीय सख्य जगजाहीर आहे. मुख्यमंत्र्यांनी महाजन यांना ताकद देऊन खडसे यांना जळगावातील सक्षम पर्याय उभा केला आहे. त्यामुळेच खडसे यांचे कार्यकर्ते नाराज आहेत. अशावेळी खडसे हे मंत्रिमंडळात कितपत रमतील याबद्दल साशंकता व्यक्त होत आहे.

(द्वारा : विनोद सूर्यवंशी)

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget