DNA Live24 2015

मुनगंटीवार यांचा भाजपला घरचा आहेर

जळगाव :
जळगावमधील मंत्री मुख्यमंत्री साहेबांच्या घनिष्ठ असतानाही या शहराचा व जिल्ह्याचा विकास करणाऱ्या प्रकल्पाच्या फाईल कशा परत येऊ शकता, असा प्रश्न करीत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जळगाव भाजपला घराचा आहेर दिला आहे.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अटल महाकृषी कार्यशाळेत मुनगंटीवार यांनी सविस्तर बोलताना काही प्रश्न उपस्थित करून अनेकांना आश्चर्याचा झटका दिला. फैजपूर येथील जे. टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयात अायाेजित अटल महाकृषी कार्यशाळेत अर्थमंत्री बाेलत हाेते.

ते म्हणाले की, राज्य मंत्रिमंडळातील मुख्यमंत्र्यांच्या जवळचे मंत्री म्हणून गिरीश महाजन यांची अाेळख अाहे. एकवेळ अर्थमंत्री म्हणून माझी फाइल परत येईल. मात्र, मंत्री महाजनांची फाइल मुख्यमंत्री परत पाठवू शकत नाहीत. तसेच राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे जळगावचे मंत्री अाहेत. एवढ्या ताकदीचे लाेक असताना जळगावकरांचे प्रश्न, समस्या का सुटत नाहीत? जळगावचा विकास का हाेऊ शकत नाही, असा उलट प्रश्न करत त्यांनी भाजप सरकारला घरचा आहेर दिला.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget