DNA Live24 2015

मोदी यांच्यावर राजधर्म भंगाचा ठपका..!

अहमदनगर :
चार वर्षांपासून सत्तेत असताना लोकपाल कायद्याची अंमलबजावणी न करणार्‍या व विविध योजनांची पोकळ घोषणा करणार्‍या नरेंद्र मोदी प्रणित भाजप सरकारवर मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद या स्वयंसेवी संघटनांच्या वतीने राजधर्म भंगाचा ठपका ठेवण्यात आला. सत्ताधार्‍यांनी राजधर्म न पाळता संसद व देशाचा अवमान केला असल्याचा आरोप संघटनांच्या वतीने करण्यात आला आहे. 

नगरच्या हुतात्मा स्मारकात झालेल्या या आंदोलनात कॉ.बाबा आरगडे, अ‍ॅड.कारभारी गवळी, अशोक सब्बन, सुधीर भद्रे, अंबादास दरेकर, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, लिला रासने, सुनिता साबळे, लता शिंदे, मनिषा राठोड, रंजना गायकवाड, अंबिका जाधव, निर्मला खामकर, शोभा चोभे, नंदा मोरे, कल्पना बोभरे, शारदा जंग्गम, आशा जोमदे आदिंसह घरकुल वंचित मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डिसेंबर 2013 डिसेंबर मध्ये लोकपाल व लोकायुक्त कायदा मंजूर करण्यात आला. जानेवारी 2014 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या बिलाचे कायद्यात रूपांतर केले. मात्र सत्तेवर येऊन चार वर्षे उलटून देखील भाजप सरकारने अद्यापि लोकपाल गठित केलेला नाही. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सत्ताधार्‍यांकडून टोलवाटोलवी चालू आहे. कोट्यावधी घरकुल वंचितांना घरे देण्याचे आश्‍वासन केंद्र सरकारने पाळले नाही. हायब्रीड लॅण्ड पुलिंगच्या माध्यमातून सरकारला स्वतःच्या जमिनीशिवाय व पैशाशिवाय परवडणारी घरे देणे शक्य असताना केंद्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. काळा पैसा परदेशातून आनण्याच्या घोषणा खोट्या ठरल्या. तर डिजिटल इंडियाचा नारा देणार्‍या या सरकारने जीओ कंपनीला चांगले दिवस आनले आणि सरकारी बीएसएनएलला खड्ड्यात टाकले. पेट्रोलचे भाव शंभरी गाठत असताना एकंदरीत मोठ्या प्रमाणात महागाई वाढली असून, सर्वसामान्यांना जगणे कठिण झाले आहे. केंद्र सरकारच्या नोटाबंदीमुळे देशांमध्ये दीड वर्ष आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. मोदी यांच्या लहरीपणा हुकूमशाहीने देशाला अच्छे दिन पहायला मिळाले नसल्याचा आरोप संघटनांच्या वतीने करण्यात आला. विविध घोषणा करुन 2019 च्या निवडणुकीचे गाजर मतदारांना दाखवून पुन्हा एकदा सत्ता काबीज करण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. एकंदरीत नरेंद्र मोदी प्रणित भाजप सरकारने राजधर्म पाळला नसल्याचे स्पष्ट करीत त्यांच्या सरकारवर राजधर्म भंगाचा ठेपला ठेवण्यात आला.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget