DNA Live24 2015

शिवसेनेचे तळ्यात-मळ्यात : छगन भुजबळ


नाशिक :
बाळासाहेब असताना झट की पट निर्णय व्हायचे पण आता तसे होत नाही. आतापर्यंत बाळासाहेबांनी कमळाबाईशी फारकत घेतली असती. शिवसेनेने तळ्यात-मळ्यातचा खेळ सोडावा आणि ठाम निर्णय घ्यावेत, असा सल्ला माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

शिवसेना सत्तेत असुन सूद्धा दररोज सेनेच्या मुखपत्रातून सरकारवर टीका होत असते. ...तर आम्ही राजीनामा देऊ असे कित्येकदा म्हणूनही सेनेला सत्ता सुटत नाही. त्यामुळे ही धर-सोड वृत्ती सोडावी. बाळासाहेब असतानाची सेना आणि आताची सेना यात जमीन-आस्मानाचं अंतर आहे असे मत आता जन-सामान्यांचेही बनत आहे, असेही त्यांनी बोलून दाखवत शिवसेनेला बाळासाहेबांची आठवण करून दिली.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget