DNA Live24 2015

कोल्हार कोल्हुबाई शाळा परिसरात वृक्षरोपण

अहमदनगर :
माजी सैनिकांच्या जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनने पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेतला असून, जिल्ह्यात वृक्षरोपण व संवर्धन अभियान सुरु आहे. या अभियानांतर्गत पाथर्डी तालुक्यातील कोल्हार कोल्हुबाई जिल्हा परिषद शाळेत वृक्षरोपण करण्यात आले.
 
वृक्षरोपण मोहिमेचा प्रारंभ जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल राजेंद्र जाधव व अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्या हस्ते वृक्षरोपणाने झाला. यावेळी पाथर्डी गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, सुरेश गोडसे, निवृत्त पोलिस अधिकारी यादवराव आव्हाड, सामाजीक कार्यकर्ते रघुनाथ औटी, बाळासाहेब ठाणगे, मुख्याध्यापक आंधळे सर, कोल्हार चे सरपंच शिवाजी पालवे, मा.मुख्याध्यापक महादेव पालवे, ग्रामपंचायत सदस्य कर्ण जावळे, अनिता नेटके, एकनाथ गुंजाळ, रावसाहेब धिंगर, अरूण गिते, आजिनाथ पालवे, दिनकर पालवे, जालिंदर जाधव, किरण पालवे, बबलू पालवे, राजु पालवे, फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, जगन्नाथ जावळे, संतोष मगर, संभाजी वांढेकर, भाऊसाहेब कर्पे, संजय पाटेकर, संतोष शिंदे, महादेव शिरसाट, टोपा पालवे, बाबाजी पालवे, यादव पालवे, बबन पालवे, सुभेदार अशोक गर्जे, संजयकुमार पाठक, मयुर नवगिरे, विष्णू डमाळे, विष्णू गिते, सैनिक पत्नी सुशिला पालवे, लक्ष्मण जावळे, लिलाबाई पालवे आदिंसह अंगणवाडी सेविका, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.

कर्नल राजेंद्र जाधव म्हणाले की, माजी सैनिकांनी उभे केलेल्या सामाजिक कार्याचा अभिमान वाटत असून, जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनासाठी हाती घेतलेली वृक्षरोपण व संवर्धन मोहिम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. सैनिक हा देशाचा अभिमान आहे. सेवानिवृत्ती नंतर समाजासाठी काही तरी करण्याची भावना असलेल्या माजी सैनिकांच्या कार्यक्रमात सहभागी होण्यास आनंद वाटत असल्याची भावना अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी व्यक्त केली. फाऊंडेशनच्या कार्याचा आढावा मेजर संतोष शिंदे यांनी घेतला. आभार सरपंच शिवाजी पालवे यांनी मानले.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget