DNA Live24 2015

शनिवारी डाळिंब निर्यातीवर चर्चासत्र


बारामती :
येथील ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित कृषी विज्ञान केंद्र आणि इफको यांच्या संयुक्त विद्यमाने निर्यातक्षम डाळिंब पीक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

निमगाव केतकी येथे होणाऱ्या या चर्चासत्रात तज्ज्ञ डॉ. बाबासाहेब गोरे, आमदार दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषद सदस्य रोहित दादा पवार, महाराष्ट्र राज्य डाळिंब बागायतदार संघाचे अध्यक्ष शहाजीराव जाचक, इफको संस्थेचे राज्य विपणन प्रमुख सतीश गाडगे, मुख्य व्यवस्थापक उदय तिजोरे, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे आदिनासह प्रमुख मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.सकाळी ९ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती युवा शेतकरी संतोष राऊत यांनी दिली आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget