DNA Live24 2015

कांद्याचा भाव वाढला; परराज्यातून मागणीत वाढ

पुणे :
परराज्यांतुन कांद्याची मागणी वाढल्याचे परिणाम आता बाजारात दिसू लागले आहेत. या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कांद्याला ५०-१०० रुपये क्विंटलने अधिकचा भाव मिळाला. सध्या कांद्याला अकराशे ते तेराशे असा भाव मिळत आहे.

तामिळनाडू व केरळमधे झालेल्या अतिवृष्टीमुळे सगळ्याच पिकांची हानी झाली. सोबतच पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश व अन्य राज्यातुनही मागणी वाढली आहे.  त्याचाच परिणाम भाव चांगला मिळतो आहे. जसजशी मागणीमधे वाढ होईल तसतसा भावात बदल होईल.

यंदाच्या वर्षी कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणावर झालेले असले तरी काही शेतकर्यांनी लगेच कांदा कमी भावात कांदा विकला, तर काहींनी साठवणूक केली. त्यांचा कांदा चांगल्या भावाने जात आहे. पण साठवणूक केल्याने कांद्याचे वजन कमी होते. याचाही फटका शेतकर्यांना बसला आहे.

मागील महिन्यात मात्र कांद्याला कमी भाव मिळाला. कर्नाटक वगळता ईतर राज्यांतून मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. येत्या काळातही कांद्याच्या भावातील चढ-उतार होत राहिल. तसेच क्रमांक एकच्या कांद्याला सतत मागणी राहिल आणि टप्प्याटप्प्याने कांदाविक्री केली तर नफा उत्तम मिळू शकतो.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget