DNA Live24 2015

छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह लिखाण; गुन्हा दाखल करण्याची मागणी

अहमदनगर :
सर्व शिक्षा अभियानांतर्गत वितरित केल्या जाणाऱ्या 'समर्थ श्री रामदास स्वामी' या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात वादग्रस्त लिखाण केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि.12) नगर शहरातील विविध  पुरोगामी संघटनाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. जिल्हा प्रशासनासह कोतवाली पोलिस ठाण्यात पुस्तकाच्या लेखिका डॉ. शुभा साठे व प्रकाशिका सौ. संध्या लाखे, पुस्तक वितरणास मान्यता देणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले की, या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात आक्षेपार्ह लिखाण करण्यात आले आहे. त्यांची जाणीवपूर्वक बदनामी करण्यात आली आहे. यातून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. या वादग्रस्त मजकुरामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. शिक्षण विभाग, पुस्तकाचे प्रकाशक व लेखिकेने समाजात वाद निर्माण केला आहे. छत्रपती संभाजी महाराजांची भयंकर बदनामी करणारा मजकूर प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या शाळकरी मुलांना अभ्यासासाठी पुस्तकात छापला आहे. हा आरएसएस भाजपचा सरकारी मनुवादी डाव आहे. त्यामुळे सदर पुस्तकावर तात्काळ बंदी आणावी. सरकारच्यावतीने या पुस्तकाच्या वितरणास परवानगी देणाऱ्या, तसेच प्रकाशक, वितरकांसह  लेखिका शुभा साठे यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत. या पुस्तकाचे वितरण थांबवावे, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, संभाजी ब्रिगेड, स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटना, शिवस्वराज्य संघटना आदी विविध संघटनांनी केली आहे. निवेदनावर बहिरनाथ वाकळे, ॲड. गजेंद्र दांगट, संध्या मेढे, भरत दळवी, अभिजीत वाघ, यशवंत तोडमल, आसिफखान दुलेखान, दीपक शिरसाठ, विलास तळेकर, रोहित वाळके, महादेव पालवे, चंद्रकांत दळवी, संभाजी कदम, दत्ता वडवणीकर, रामदास वागस्कर, सागर पठाडे, आकाश दातीर, रविंद्र नवाळे, अरुण थिटे, महेंद्र कवडे आदींच्या सह्या आहेत. दरम्यान पुस्तकाच्या प्रती तपासून गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले असल्याचे वाकळे यांनी सांगितले.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget