DNA Live24 2015

हापूसला मिळाली विशेष ओळख..!

मुंबई :
कोकणातला हापूस आंबा म्हणजे अवीट गोडी आणि अमिट असा आनंद देणारे फळ. याच फळाला आता जागतिक पातळीवर स्पेशल अशी ओळख मिळाली आहे. त्यामुळे हापूस आंबा उत्पादकांना याचा मोठा लाभ होणार आहे.

हापूस आंब्याला बौद्धिक संपदा कायद्याअंतर्गत भौगोलिक मानांकन (जीआय) जाहीर झाले आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुर्दुग व लगतच्या परिसरातील हापूसला हे भौगोलिक मानांकन मिळाले आहे. येथील हापूस आंबा उत्पादनांवर असे मानांकन मिळालेले चिन्ह यापुढे दिसेल. मूळ भौगोलिक स्थानावरून उत्पादनाचा दर्जा आणि गुणवत्ता याची ओळख करण्याचे हे विशेष मानांकन आहे.

भौगोलिक मानांकनामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हापूसची वेगळी ओळख निर्माण होणार आहे. सध्या हापूस आंबा म्हणून कर्नाटक, आंध्र प्रदेश किंवा गुजरातचा कोणताही आंबाही सरसकट विकला जात आहे. यामुळे ग्राहकांची फसवणूक होत आहे. कोकणातील उत्पादकांचेही यामुळे नुकसान होत आहे. अशा फसवणुकीवर आता कायदेशीर कारवाई करणे शक्य होणार आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget