DNA Live24 2015

आपत्ती व्यवस्थापन सप्ताहास सुरुवात

अहमदनगर :
जिल्ह्यात दि.09 ऑक्‍टोंबर ते 13 ऑक्‍टोंबर या कालावधीत आपत्ती व्‍यवस्‍थापन आठवडा साजरा करण्यात येणार असून त्याचे उदघाटन अपर जिल्‍हाधिकारी भानुदास पालवे यांच्या हस्‍ते करण्‍यात आले.  येथील सीएसआरडी संस्थेत आयोजित कार्यक्रमास यशदा, पुणे येथील आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षक श्री. परदेशी, नेहरु युवा केंद्र समन्‍वयक बाबासाहेब गोडसे, सीएसआरडीचे संचालक डाँ.पठारे,  महापालिका अग्निशमन अधिकारी श्री. मिसाळ, जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिकारी डॉ.विरेंद्र बडदे उपस्थित होते.

आज सी.एस.आर.डी. येथे जिल्‍हयातील नेहरु युवा केंद्र स्‍वयंसेवक व आपत्‍ती व्‍यवस्‍थापन विभाग सी.एस.आर.डी. महाविदयालय यांचेसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. यशदा पुणे यांचेकडील प्रशिक्षकांमार्फत आपत्‍ती व आपत्‍ती व्‍यवस्‍थापन तसेच प्रथमोपचार व शोध व बचावाचे प्रात्‍यक्षिकांसह प्रशिक्षण देण्‍यात आले. तसेच अग्निशमन अधिकारी श्री. मिसाळ यांनी आग प्रतिबंधात्‍मक उपाययोजना बाबत माहिती दिली.

प्रशिक्षण दिलेल्‍या नेहरु युवा केंद्र स्‍वयंसेवकांना विविध आपत्‍ती मार्गदर्शक पोस्‍टर्स व हॅण्‍डबिल्‍सचे वितरण यावेळी करण्‍यात आले. या युवा केंद्राचे माध्‍यमातून गांवपातळीवर नागरीकांना मार्गदर्शन करावे व जनजागरण कार्यक्रमांचे आयोजन करण्‍याबाबत डॉ.बडदे यांनी आवाहन  केले.

दिनांक 13 ऑक्‍टोंबर आपत्‍ती निवारण दिन साजरा करण्‍याच्‍या अनुषंगाने जिल्‍हाधिकारी तथा  जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाचे अध्‍यक्ष राहुल द्विवेदी आणि  निवासी उपजिल्‍हाधिकारी तथा मुख्‍य कार्यकारी अधिकारी, जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्‍हयात 09 ते 13 ऑक्‍टोंबर 2018 या कालावधीत आपत्‍ती व्‍यवस्‍थापन व जनजागरण व प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले आहे. आज पारनेर, राहुरी आणि संगमनेर तहसील कार्यालयाच्या वतीनेही आपत्ती व्यवस्थापन सप्ताहानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget