DNA Live24 2015

कर्जमुक्तीसाठी शेतकरी संघटनेचे धरणे

भुसावळ :
कोणतेही निकष न लावता सरसकट कर्जमुक्ती, शासकीय धान्य खरेदी त्वरित सुरू करणे, शेतमाल विक्रीनंतर ४८ तासांच्या आत शेतकऱ्यांना पैसे चुकते करणे आदी प्रमुख प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी संघटनेने बोदवड तहसील कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन केले. यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

(स्व.) शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेेचे माजी खान्देश विभागप्रमुख कडू पाटील, जिल्हाध्यक्ष दगडू शेळके यांच्या नेतृत्वाखाली नवीन तहसील कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात, कोणतेही निकष न लावता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती, हमीभावात धान्य खरेदी, बोंडअळीसाठी जाहीर केलेली मदत देणे, निवडणूक जाहीरनाम्याप्रमाणे आश्वासनपूर्ती, शेतकऱ्यांना ४८ तासांत शेतीमालाचे चुकारे देणे, संपूर्ण विज बिल माफी, बोदवड तालुक्यातील तीन सर्कलचा कापूस पीक विमा नुकसान भरपाई अहवाल प्रसिद्ध करणे, बोदवड उपसा सिंचन योजना दोन वर्षात पूर्ण करण्याचे आश्वासन जलसंपदा मंत्र्यांनी पाळावे, अशा मागण्या करण्यात आल्या. प्रामुख्याने शासनाच्या विचाराधीन असलेला भूजल कायदा मान्य नसल्याची भूमिका घेत त्याची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. मधुकर पाटील, नाना परदेशी, ईश्वर लिधुरे, पुरुषोत्तम पाटील, प्रवीण मोरे, राजेंद्र चौधरी, राहुल वाघ, अभिमान हटकर, संतोष पाटील, संतोष राणा, विजय पाटील, अक्षय पाटील, शामलाल तेली, गोपाळ नारखेडे आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget