DNA Live24 2015

तर बाजार समित्या स्वयंपूर्ण होतील : प्रशांत गायकवाड

अहमदनगर :
राज्य सरकारने सोलर प्रकल्पाला मान्यता दिल्यास जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होतील. तर बाजार समित्यांना महावितरणकडे वीज मागण्याची गरज भासणार नाही. बाजार समित्यांना वीज बिलासाठी लाखो रुपये दरवर्षी मोजावे लागतात. तो खर्च वाचून अनेक बाजार समित्या नफ्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असून, शासनाने सोलर प्रकल्पाला मान्यता दिल्यास राज्यातील पहिला सोलर प्रकल्प जिल्ह्यात उभा राहणार असल्याची भावना पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी व्यक्त केली.

पारनेर तालुका बाजार समितीवर नाट्यमयरीत्या सभापती पदावर पुन्हा विराजमान झाल्याबद्दल प्रशांत गायकवाड यांचा नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नगर बाजार समितीचे सभापती विलासराव शिंदे, संचालक संदीप कर्डिले, रेवणनाथ चोभे, बाबापाटील खर्से, बन्सी कराळे, संतोष म्हस्के, कानूभाऊ कासार, बाळासाहेब निमसे, गुलाबराव लांडगे आदी उपस्थित होते.

गायकवाड पुढे म्हणाले की, शेतकर्‍यांची कामधेनु असणारी बाजार समितीचा विकास झाला पाहिजे. कारभार करीत असताना शेतकर्‍यांना न्याय देण्याची भावना बाजार समितींच्या चालकांची आहे. जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी बाजार समित्यांमध्ये एक मेगावॅट सोलर प्रकल्प उभा राहिला तर बाजार समित्यांना वीज मंडळाकडून एक रुपयाची वीज घेण्याची गरज भासणार नाही. सभापती होण्यापूर्वी पारनेर बाजार समिती 36 लाख रुपये नफ्यात होती. दोन वर्षाच्या काळात बाजार समितीचा नफा 1 कोटी 36 लाखांचा झाला आहे. अनेक शेतकरी हिताच्या नवनवीन योजना आनत असताना स्वपक्षातील नेत्याला प्रतिस्पर्धी निर्माण होण्याच्या भीतीपोटी राजकीय खेळी करण्यात आली. परंतु पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे नेते आ.दिलीप वळसे पाटील, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, मा.आ. दादाभाऊ कळमकर यांच्यासह अनेकांनी ताकद व खंबीर पाठिंबा दिल्याने विरोधकांचा अविश्‍वास ठराव बारगळला असल्याचे त्यांनी सांगितले.

 युवा नेते संदीप कर्डिले म्हणाले की, नगर-पारनेरचे जुने नाते आहे. बाजार समित्या शेतकर्‍यांना डोळ्यासमोर ठेऊन विविध योजना व उपक्रम हाती घेत असते. काही वेळेस बाजार समितीमध्ये कठोर निर्णय घ्यावे लागतात. बाजार समितीने नवीन नवीन योजना शेतकरी हितासाठी राबवाव्या लागणार असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थितांची भाषणे झाली.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget