DNA Live24 2015

मोदींची गाडी पंक्चर झाली आहे : राहुल गांधी


सेवाग्राम (वर्धा) :
लोकांनी नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आणून पहिले आणि अनुभवले आहे. मात्र, विकास आणि शेतकरी धोरणाबाबत आता त्यांची गाडी पंक्चर झाली आहे. त्यामुळेच या सरकारला आता पुन्हा संधी मिळणार नसल्याचा दावा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.

सेवाग्राम येथे त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, नरेंद्र मोदींनी शेतकरी, तरुणांना खोटी आश्वासनं दिली. खात्यात 15 लाख जमा करणार होते, 2 कोटी रोजगार निर्मिती करणार होते. पिकांना योग्य किंमत देईन असं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं मात्र त्याचं काहीच झालं नाही. जनतेला हे सर्व समजले आहे. त्यामुळेच पुन्हा भाजप सरकारला जनता संधी देणे अशक्य आहे. तसेच अनुभव नसताना अनिल अंबानी यांच्या कंपनीला राफेल विमानाचा करार का देण्यात आला, असा सवाल काँग्रेस अध्यक्ष गांधी यांनी विचारला आहे. 

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget