DNA Live24 2015

दुष्काळ घोषित करण्यासाठी राष्ट्रवादीची निदर्शने

अहमदनगर :
तालुका दुष्काळी घोषित करण्याच्या मागणीसाठी नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

या आंदोलनात आ.राहुल जगताप, तालुकाध्यक्ष गहिनीनाथ (दादा) दरेकर, शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, अशोक कोकाटे, सागर वाळुंज, अंकुश काळे, राजकुमार आघाव, साहेबराव पाचारणे, अनिल नरोडे, रमेश काळे, सुरत बडे, पापामिया पटेल, श्रीकांत शिंदे, गजेंद्र भांडवलकर, वैभव म्हस्के, विकास झरेकर, मनोज भालसिंग, अक्षय भिंगारदिवे, बाळासाहेब रोहोकले, पवन कुमटकर, अंकुश काळे, रोहिदास शिंदे, गोटू दरेकर, ओमकार गोडळकर आदींसह नगर तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले होते.  

नगर तालुक्यामध्ये अत्यल्प पर्जन्यवृष्टी झाल्याने अत्यंत भयानक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.पावसाच्या सर्व नक्षत्रांमध्ये अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने नगर तालुक्यात कुठल्याही प्रकारच्या पेरण्या यशस्वी झालेल्या नाहीत. मुग, बाजरी, कांदा व इतर पिकांच्या पेरण्या पावसाअभावी वाया गेल्या आहेत. दुबार पेरणी सुद्धा वाया गेलेली असून, शेतकरी अत्यंत अडचणीच्या परिस्थितीमध्ये आहे. नगर तालुक्यातील शेतकरी पावसाचे पाणी व उपलब्ध छोटे-मोठे तलाव, बंधारे, पाणी साठवणीचे क्षेत्र यावर अवलंबून आहे. परंतु सर्व तलाव, बंधारे, तळे पावसाअभावी कोरडी पडलेली आहेत. यामुळे शेतकर्‍यांपुढे शेती व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय चार्‍या अभावी मोडकळीस आला आहे. शेतकर्‍यांपुढे पशुधन वाचवण्याचे सर्वात मोठे संकट उभे राहिले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. 

नगर तालुका दुष्काळी म्हणून घोषित करावा, नगर तालुक्यात पशुधन वाचविण्यासाठी चारा छावणी मंजूर व्हावी, ज्या गावांना पिण्याच्या पाण्याची परिस्थिती नाजूक आहे त्या गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु करावे, दुग्ध व्यावसायिक शेतकर्‍यांना शासनाच्या वतीने सबसिडी देण्यात यावी, दुधाला हमीभाव 25 रु. प्रती लिटर हा कायमस्वरूपी असावा, ज्या शेतकर्‍यांनी केलेल्या पेरण्या पावसाअभावी वाया गेली त्यांना शासनाने दुष्काळी विमा जाहीर करावा, शेतकर्‍यांचे संपूर्ण वर्षाचे वीज बिल माफ करावे व शेतकर्‍यांच्या मुलाचे एक वर्षाची शैक्षणिक फी माफ करण्याची मागणी नगर तालुका राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना देण्यात आले.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget