DNA Live24 2015

'शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन कधी? परिसंवादात विचारमंथन

पुणे :
महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे  ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी’ सप्ताहानिमित्त 'शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन कधी ? या विषयावर  परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.

या परिसंवादा मध्ये पाशा पटेल (अध्यक्ष ,कृषी मूल्य आयोग), अजित नवले (सचिव, शेतकरी सुकाणू समिती) यांचा सहभाग होता. अध्यक्षस्थानी डॉ.कुमार सप्तर्षी होते.

हा परिसंवाद गांधीभवन कोथरूड येथे बुधवार, दिनांक ३ ऑक्टोबर सायंकाळी ६ वाजता आयोजित केला होता

 अप्पा अनारसे, रवी लाटे, सचिन पांडुळे हे संयोजक  तसेच संदीप बर्वे उपस्थित होते. पाशा पटेल म्हणाले,' ४२ वर्ष मी शेती प्रश्नांसाठी झगडत आहे.पदावर असल्याने समर्थनाची भूमिका घेत असलो, तरी आतून माझा संघर्ष सुरु असतो. आयात खाद्यतेलावर ड्यूटी वाढवण्याची मी भूमिका घेतल्याने देश पाच वर्षात स्वयंपूर्ण होणार आहे. माझ्या प्रयत्नांमुळेच राज्या राज्यात कृषी मूल्य आयोगाची स्थापना झाली. मोदी सरकारमुळे डाळी, इथेनॉल , आयात -निर्यात धोरण याबाबत चांगले निर्णय घेतले. मी शेतकरी आहे, दलाल नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना ' अच्छे दिन ' यावे, यासाठीच प्रयत्न करीत राहीन '

कॉम्रेड  अजित नवले म्हणाले, ' शेतकऱ्याच्या उत्पन्नाची लूट होत आली आहे.कर्जमुक्ती म्हणजे त्या लुटलेल्या उत्पन्नातून केलेली अंशतः परतफेड आहे. शेतमालाला हमीभाव,कर्जमुक्ती,विषमुक्त शेती महत्वाची ठरणार आहे. भाजपचे दीडपट हमी भाव फसवे ठरले. भाजपच्या कोणत्याही राज्यात हमी भाव मिळालेला नाही. शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट वाढवण्याची  नीती आयोगाची कल्पना हा एक जुमलाच आहे. प्रक्रिया आणि विक्री या टप्प्यात नफ्याची निर्मिती होते, त्यात शेतकऱ्याला वाटा मिळाला पाहिजे. फक्त आयात -निर्यात धोरणाने काहीही होणार नाही.

शेतमालाला घामाचे रास्त दाम देऊन गरीबाला अन्न देणे, आणि महागाई नियंत्रण करणारे सूत्र स्वामीनाथन आयोगाने सांगीतले आहे, त्याकडे दूर्लक्ष झाले आहे.

डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले, ' देशाचे अन्न स्वावलंबित्व जागतिक संघर्षात महत्वाचे आहे, म्हणून शेतकरी जगवला पाहिजे.१ोती हा जीवाभावाचा प्रश्न असल्याने कोणत्याही पक्षाने पोकळ घोषणा करु नये.

पाशा पटेल यांनी सरकारची बाजू मांडली. ते स्वतः चळवळीची पार्श्‍वभूमी असलेले असल्याने मूलभूत चिंतनही केले.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget