DNA Live24 2015

भाजपही पुन्हा अजमाविणार स्वबळ..!

मुंबई :
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे वातावरण राज्यभर तापत आहे. अशावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होण्याचे संकेत मिळत असतानाच शिवसेनेने मात्र, यंदा स्वबळ पुन्हा जमविण्याची घोषणा करून टाकली आहे. अशावेळी मग युतीमधील मोटाभाई भाजपने स्वबळावर लढण्यासाठी तयार होत असल्याचे चित्र आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी यासाठी आढावा घ्यायला सुरूवात केली आहे.

केंद्र आणि राज्यात शिवसेना-भाजप युती सत्ताधारी आहे. मात्र, युतीत सारे काही आलबेल नाही, हे आता उघड गुपित आहे. सत्तेत असूनही फसवणूक करणार्‍या भाजपला धक्का देण्यासाठी शिवसेना सरसावलेले आहे. भाजपने अनेकदा चुचकारूनही सेनेने भाजपवर टीका करणे सोडलेले नाही. निवडणूक जवळ आलेली असतानाही सेनेकडून सबुरी राखली जात नसल्याबद्दल भाजपत नाराजी होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष दानवे यांनीही स्वबळाची भाषा सुरू केली आहे. त्यामुळे यंदा राज्यात तिरंगी लढती होण्याची चिन्हे आहेत.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget