DNA Live24 2015

डॉ. झाकीर हुसेन मदरसा योजनेसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

अहमदनगर :
राज्यातील नोंदणीकृत मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यात येते. या योजनेसाठी इच्छुक मदरशांनी परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर यांच्याकडे 30 ऑक्‍टोबर 2018 पर्यंत सादर करावेत, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव राहुल द्विवेदी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी म्हटले आहे, राज्यातील नोंदणीकृत मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत पात्र मदरशांची शासनास अनुदानासाठी शिफारस करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. मदरशांकडून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांची ही समिती शासन निर्णयात विहित केलेल्या निकषानुसार तपासणी करुन पात्र मदरशांची शिफारस शासनाकडे करण्यात येते.

इच्छुक मदरशांनी आपला परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर यांच्याकडे सादर करण्याचा अंतिम दिनांक 30 ऑक्‍टोबर  2018 आहे. त्यानंतर प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत, असेही जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी नमूद केले आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget