DNA Live24 2015

विडी कामगारांची निदर्शने

अहमदनगर :
साप्ताहिक मजुरी रोख मिळावी, पेन्शनमध्ये वाढ करावी, तेलंगणा राज्यातील विडी कामगारप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील कामगारांना आसरा अनुदान मिळावे तसेच विडी विक्रीवरील 28 टक्के जीएसटी रद्द करण्याच्या मागणीसाठी नगर शहरातील विडी कामगारांनी काम बंद आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. या आंदोलनात महाराष्ट्र राज्य कामगार फेडरेशन, लालबावटा विडी कामगार युनियन व नगर विडी कामगार संघटना सहभागी झाल्या होत्या.

विडी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी विडी कामगार नेते कॉ.शंकर  न्यालपेल्ली, बन्सी सातपुते, गनीभाई शेख, भैरवनाथ वाकळे, शंकरराव मंगलारप, सुमित्रा जिंदम, संगीता कोंडा, चंद्रकांत मुनगेल, श्रीमल बुच्चमा, कविता मच्चा, निर्मला न्यालपेल्ली, लक्ष्मी कोटा, शारदा बोगा आदी उपस्थित होते. शहरात सुमारे पाच हजार विडी कामगार अस्तित्वात आहे. केंद्र सरकारने व राज्य सरकारने विडी कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले असल्याने त्यांच्या रोजगाराचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे विडी कामगारांमध्ये असंतोष पसरला असून, विविध न्याय हक्क मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

 विडी कामगारांची मजुरी बँकेत जमा करण्याची पद्धत बंद करावी व पूर्ववत साप्ताहिक मजुरी रोख स्वरूपात कामगारांना मिळण्यासाठी शासनाने परवानगी द्यावी, केंद्र सरकारने विडी कामगार व पेन्शनर कामगारांच्या पेन्शनमध्ये वाढ करावी, तेलंगणा राज्यातील विडी कामगाराप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील विडी कामगारांना दरमहा एक हजार रुपये अनुदान मिळावे, विडी विक्रीवरील 28 टक्के जीएसटी कर रद्द व्हावी, विडी कामगारांचे किमान वेतन पुर्ननिर्धारित करण्यासाठी त्रिपक्ष समिती नेमण्यात यावी, एपीएल शिधापत्रिका धारकांना पूर्वीप्रमाणे स्वस्त दरात धान्य पुरवठा करण्यात यावा तसेच अहमदनगर जिल्ह्याकरिता स्वतंत्र्य प्राव्हिडंड फंड उपायुक्त कार्यालय सुरू करण्याच्या मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन नायब तहसिलदार माधुरी आंधळे यांना देण्यात आले. 

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget