DNA Live24 2015

कोतवाल पदाची भरती

अहमदनगर :
तालुक्‍यातील  जेऊर, निमगाव वाघा, टाकळी काझी, मेहेकरी, मठपिंप्री, सारोळाबध्‍दी, नागरदेवळे, भिंगार, केडगाव, वाकोडी, वाळूंज अकोळनेर, कौंडगाव व चास या  चौदा सजामध्‍ये तात्‍पुरत्‍या स्‍वरुपात कोतवाल पदासाठी भरती करण्‍यात येणार आहेत.

 नगर तालुक्‍यातील सजा - जेऊर ( जेऊर, धनगरवाडी) अनुसूचित जमाती आरक्षणाचा संवर्ग,  निमगाव वघा (  निमगाव वाघा, पिंपळगाव वाघा )  आरक्षण  खुला (महिला राखीव),  टाकळी काझी ( टाकळी काझी, मदडगाव) आरक्षण इतर मागास वर्ग, मेहेकरी ( मेहेकरी, बारदरी, पिंपळगांव लांडगा, सोनेवाडी ) आरक्षण खुला, मठपिंप्री (मठपिंप्री, हातवळण, आंबिलवाडी)  आरक्षण  विमुक्‍त जाती अ वर्ग,  सारोळाबध्‍दी ( सारोळाबध्‍दी , कोल्‍हेवाडी, शहापूर) आरक्षण  खुला वर्ग,  नागरदेवळे (नागरदेवळे ) आरक्षण  खुला वर्ग, भिंगार ( भिंगार) आरक्षण अनुसूचित जमाती (महिला राखीव) , केडगाव ( केडगाव) आरक्षण खुला  वर्ग,  वाकोडी (  वाकोडी, दरेवाडी) आरक्षण खुला वर्ग, वाळूंज (वाळूंज, पारगाव मौला)  आरक्षण  खुला वर्ग, अकोळनेर ( अकोळनेर, भोरवाडी, जाधववाडी) आरक्षण  इतर मागास वर्ग (महिला राखीव) , कौंडगाव ( कौंडगाव, जांब, बाळेवाडी ) आरक्षण  इतर मागास वर्ग, व चास ( चास , सोनेवाडी, भोयरेपठार, भोयरे खुर्द) आरक्षण  खुला (महिला राखीव) या सजामध्‍ये  तात्‍पुरत्‍या स्‍वरुपात कोतवाल पदाची भरती करण्‍यात येणार आहे.  तसेच कोतवाल  या पदासाठी प्रतिमाह 5 हजार रुपये मानधन देण्‍यात येणार आहे.

कोतवाल  पदासाठी पात्रतेच्‍या अटी व शर्ती – महाराष्‍ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील विहित केलेले अटी व शर्ती उमदेवारांवर बंधनकारक राहील.  कोतवाल हे पद वर्गीकृत नाही,  उमेदवाराचे वय 5 ऑक्‍टोबर 2018 रोजी  18 वर्षापेक्षा कमी व 40 वर्षापेक्षा अधिक नसावे.उमेदवारांनी ज्‍या सजेच्‍या जागेसाठी अर्ज केला आहे. त्‍याच सजातील कायमचा रहिवासी असावा. तसेच त्‍यास स्‍थानिक परिस्थितीचे ज्ञान असणे आवश्‍यक आहे.  उमेदवारांची शैक्षणिक पात्रता किमान इयत्‍ता 4 थी उत्‍तीर्ण असावी.  उमेदवार हा कोतवाल पदाची कर्तव्‍ये पार पाडण्‍यास सक्षम असणे आवश्‍यक आहे.  प्रत्‍येक सजेत केळव एक पद उपलबध आहे व ते शासकीय निकषांनुसार आर‍क्षित करण्‍यात आलेले आहे. अर्ज करताना उमदेवाराने आरक्षण तपासूनच अर्ज करावा.  संपूर्ण भरती प्रक्रिया सजेनिहाय होणार असून कोणत्‍याही  दोन सजेच्‍या प्रक्रियेचा एकमेकांशी संबध नाही.  कोतवालांना क्षेत्रिय स्‍तरावर काम करावे लागेल. त्‍यामुळे सदर पद धारण करणारी व्‍यक्‍ती ही शाररीक दृष्‍टया सक्षम असणे आवश्‍यक आहे. अपंगासाठीचेआरक्षण लागू करण्‍यात आलेले नाही. कोतवाल हे पद एका सजेत एकच असते. त्‍यामुळे हे पद एकाकी असल्‍याने त्‍यांना प्रकल्‍पग्रस्‍त , माजी सैनिक खेळाडू यासारखी समांतर आरक्षणे नाही व शासन निर्णय 25 मे 2001 नुसार पुरेशा प्रमाणात महिला उमेदवार उपलब्‍ध न झाल्‍यास इतरत्र अदलाबदल न करता त्‍याच प्रवर्गातील पुरुष उमेदवारामधून महिलांसाठी राखीव असलेले पदे भरण्‍यात येतील.

पदभरतीचा कार्यक्रम -  विहित नमुन्‍यातील अर्ज तहसील कार्यालयातून प्राप्‍त करुन घेणे – दि. 5 ते 26 ऑक्‍टोबर 2018 ( शासकीय सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन कामकाजाच्‍या वेळेत) उमदेवाराने माहिती भरलेले व आवश्‍यक कागदपत्रे जोडलेले अर्ज तहसील कार्यालयात सादर करणे- 26 ऑक्‍टोबर 2018 पर्यत. छाननी अंती लेखी परीक्षेस पात्र / अपात्र ठरलेल्‍या उमेदवारांची यादी 29 ऑक्‍टोबर 2018 रोजी तहसील कार्यालयाच्‍या नोटीस बोर्डावर प्रसिध्‍द करण्‍यात येईल. लेखी परीक्षा 1 नोव्‍हेंबर 2018 रोजी लेखी परीक्षेतून गुणानुक्र्रमे तोंडी परीक्षेस पात्र / अपात्र  ठरलेल्‍या उमेदवारांची यादी 2 नोव्‍हेंबर 2018 रोजी तहसील कार्यालयाच्‍या नोटीस बोर्डावर लावण्‍यात येईल. तोंडी परीक्षा 3 नोव्‍हेंबर 2018 रोजी घेण्‍यात येईल.  अंतिम निवड यादी 5 नोव्‍हेंबर 2018 रोजी तहसील कार्यालयाच्‍या नोटीस बोर्डावर लावण्‍यात येईल.

नैसर्गीक  आपत्‍ती व इतर कोणत्‍याही अपरिहार्य कारणास्‍तव भरती प्रक्रिया कामकाजातील दिनांकामध्‍ये बदल झाल्‍यास सुधारीत दिनांक निश्चित करुन कळविण्‍यात येईल. अपात्र उमदेवारांना स्‍वतंत्ररित्‍या कळविले जाणार नाही याची नोंद घ्‍यावी असे अध्‍यक्ष कोतवाल निवड समिती 2018 तथा नगर भागचे उपविभागीय अधिकारी  उज्‍वला गाडेकर यांनी एका  प्रसिध्‍दी पत्रकान्‍वये  कळविले आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget