DNA Live24 2015

मग त्याला आमदार झाल्यासारखं वाटतंय : पवार

पुणे :
लोकसभाव व विधानसभा निवडणुकीसाठीची मोर्चेबांधणी राज्यभर सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर सध्या भावी आमदार-खासदार मंडळींची संख्या बेसुमार वाढली आहे. त्यावर मिश्कीलपणे टिपण्णी करताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकत्यांना म्हटले आहे की, "कोणालाही आमदार म्हणत बसू नका. 'या आमदार, बसा आमदार’ असे म्हटल्यामुळे त्याच्याही डोक्‍यात हवा जाते आणि त्याला आमदार झाल्यासारखे वाटते. मात्र, त्यामुळे खरा कार्यकर्ता बाजूला पडत आहे. पक्षासाठी प्रत्येक कार्यकर्ता हा महत्वाचा आहे."

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक जिल्हा बॅंकेमध्ये पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यांनी नेहमीच्या “स्टाईल’ने कोपरखळ्या मारत कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षातील कार्यकर्त्यांनी आपसातील मतभेद विसरून कामाला लागा, असा सल्ला पवार यांनी दिला.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget