DNA Live24 2015

'राष्ट्रवादी'च्या खेळीने विखेंची पंचाईत..!

अहमदनगर (राहुल ठाणगे) :
लोकसभा निवडणुकीचे वेध लागल्याने देशभरात राजकीय वातावरण तापले आहे. त्याच धर्तीवर 4 वर्षांपासून शांत असलेली राष्ट्रवादी काँग्रेसही राज्यभरात सक्रिय झाली आहे. त्याचीच झळ नगर लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक असलेल्या विखे पाटील गटाला बसली आहे.

विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांची एकमेकांवरील राजकीय कुरघोडीची परंपरा जुनी आहे. माजी खासदार स्व. बाळासाहेब विखे यांच्यानंतर विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही परंपरा खंडित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता या मतदार संघातून राष्ट्रवादीऐवजी काँग्रेसतर्फे सुजय विखे रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त होत होती. त्याच शक्यतेला आता राष्ट्रवादीने पूर्णविराम दिला आहे. हा मतदारसंघ कायम ठेवण्यासह विजय मिळविण्यासाठी लढविण्याची घोषणा पवार साहेबांनी केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीही असेच सूचित केले आहे. त्यामुळे विखे पाटील गटात अर्थपूर्ण शांतता पसरली आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी नगर दक्षिण मतदारसंघामधुन आमदार अरुण काका जगताप यांचे नाव  राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी पुढे केल आहे. गेल्या काही दिवसापासुन मतदारसंघ बदलाची चर्चा असताना अचानक जगताप यांचे नाव राष्ट्रवादीतुन पुढे आल्याने मतदारसंघ बदलाच्या चर्चांना पुर्ण विराम मिळाला आहे. राष्ट्रवादी पुर्ण ताकदीनिशी या निवडणुकीत उतरणार असल्याने खासदारकीच्या 'सुजया'चे स्वप्न पाहणाऱ्या 'प्रवरे'ची दांडी गुल झाली आहे. या खेळीनंतर प्रवरेच्या सुजय विखे यांच्या यंत्रणेची पुढची वाटचाल कुठल्या दिशेने होते हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget