DNA Live24 2015

साहेबांच्या बारामतीवर विरोधकांची नजर..!

राष्ट्रवादीचा गड समजल्या जाणाऱ्या बारामतीमध्ये दरवेळी भाजपकडून लोकसभा निवडणूक लढविली जाते. तर, शिवसेना येथील विधानसभा निवडणूक वाढविते. मात्र, आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष स्थापन केल्यावरही बारामतीकरांनी माजी कृषिमंत्री शरद पवार यांनाच एकहाती कौल दिला आहे. मात्र, यंदा येथील निवडणूक आणखी जोमाने लढवून पवार कुटुंबियांना येथेच जाम करण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे.

या मतदारसंघात राष्ट्रवादीला पायउतार करणे अद्यापि कोणालाही जमलेले नाही. एवढे असूनही विरोधी पक्षांना बरीच चांगली मते मिळतात. हीच काय ती जमेची बाजू. त्यातही राष्ट्रीय समाज पक्षाला गतवेळेस चांगलीच मते मिळाली, परंतु शिवसेना मात्र विधानसभा निवडणुकीत बरीच मागे राहिली. यामुळेच यंदा विधानसभाही भाजपानेच लढवावी अशी मागणी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

त्यातच राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी ते स्वतः व पवार कुठुंबियांपैकी नवे कोणीही निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर  केल्यानंतर विरोधकांच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत. बारामती विधानसभेची जागा गेली कित्येक वर्ष शिवसेनेकडे आहे. आता ती जागा भाजप लढवू इच्छिते. याबद्दल दोन्ही पक्षात बोलणी सुद्धा झालेली आहेत. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान देईल असा एकही कट्टर विरोधक पवारांनी बारामती मतदार संघात तयार होऊ दिलेला नाही. असे असले तरीही गेल्यावेळी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना काठावर पास व्हावं लागल होत. विधानसभा निवडणुकीतही अजित पवार यांना विरोधकांनी चांगलीच लढत दिली होती. त्यातच बारामती तालुक्यात त्यांचे झालेले दुर्लक्ष व सुमार वक्तव्यांमुळेही तालुक्यात पवारांवर लोकांची नाराजी आहे.
हीच नाराजी फक्त विरोधकांना जमेची वाटत आहे. त्याच किरकोळ भांडवलावर भाजप येथे इच्छुक आहे.

भाजप शिवसेना यांच्यात ‘तु..तू..मै..मै’...
लोकसभेसह बारामती विधानसभा निवडणूक भाजपा लढवू इच्छितो. यामुळे भाजप व शिवसेना यांची पुन्हा तू..तू..मै..मै... सुरु होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास याचा फायदा राष्ट्रवादीला होईल हे नक्कीच...

(द्वारा : पंकज नाईकवाडे)

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget