DNA Live24 2015

पुढच्या वर्षी होणार दुष्काळ जाहीर..!

लातूर :
येथील राज्य शासनाच्या वतीने आयोजित अटल महाआरोग्य शिबिराचे उद्‌घाटन केल्यानंतर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळ जाहीर होण्यास पुढच्या वर्षीची वाट पाहावी लागणार असल्याचे स्पष्ट सूचित केले आहे. त्यांच्या या 'दिलासादायक' बोलण्याने शेतकरी बांधव संतप्त भावना व्यक्त करीत आहेत. 

लातूरच्या कार्यक्रमात ते म्हणाले की, 'मराठवाड्यावर टंचाईचे सावट आहे. त्यामुळेच याचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. याची सर्व माहिती 31 डिसेंबरपर्यंत हाती येईल. त्याआधारे टंचाईची स्थिती ठरल्यावर केंद्र सरकारचे पथक येऊन पाहणी करेल. त्यानंतर दुष्काळ जाहीर करण्यात येईल. टंचाईवर मात करण्यासाठी सरकार तुमच्या पाठीशी आहे.

एकूणच आज-आज.. उद्या-उद्या... करीत राज्यातील भाजप आणि केंद्राचे भाजप सरकार यांच्यात याप्रकरणी आता खो-खोचा डाव रंगणार आहे. मात्र, त्यात मराठी शेतकऱ्यांचा फुटबॉल होणार असल्याचेच चिन्ह आहेत.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget