DNA Live24 2015

"मर जवान, मर किसान हीच मोदी सरकारची मानसिकता"


मुंबई :
मर जवान, मर किसान हीच मोदी सरकारची मानसिकता असून गांधी जयंतीच्या दिवशी अहिंसेचे भान न ठेवता शेतकऱ्यांवर अश्रुधूर आणि लाठीचार्ज केला गेला. त्यामुळे भाजपाचा हिंसक चेहरा समोर आला, अशी टीका राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली आहे.

‘किसान क्रांती पदयात्रा’ दिल्लीमध्ये अडवण्यात आली. महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी अहिंसेचे भान न ठेवता केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर अश्रुधूर आणि लाठीचार्ज केला गेला. त्यामुळे भाजपाचा खराखुरा हिंसक चेहरा समोर आलेला आहे. या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस निषेध करते. शेतकऱ्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस खंबीरपणे उभी आहे. मोदी सरकार म्हणत होते ‘मर जवान, मर किसान’ आता त्यांची मानसिकता अधिक प्रखरपणे या घटनेतून स्पष्ट झाली, असे त्यांनी म्हटले आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget