DNA Live24 2015

अहमदनगर लोकसभेसाठी रस्सीखेच..!


अहमदनगर :
भाजप-सेना युतीचे संकेत दिसत असल्याने भाजपचे खासदार दिलीप गांधी यांची प्रचारमोहीम समाजमाध्यमांद्वारे जोरात चालू होती. अशातच शिवसेनेने घनश्याम शेलार यांचे तिकीट फिक्स करत सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. त्यातच काँग्रेस-राष्ट्रवादीचे त्रांगडे कायम आहे. एकूणच यंदा ही जागा कोणाला 'पावणार' याबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

सेनेच्या उमेदवारीचा मोठा फटका गांधीना बसू शकतो. गांधींची उमेदवारी ठरलेली नसताना ते आपले घोडे बळंच दामटवत जैय्यत तयारी करत आहेत, अशीच चर्चा आहे. येत्या काळात गांधीची पक्षनिष्ठा किती कामी येईल, हे भाजपा पक्षश्रेष्ठींचा उमेदवारीचा निर्णयच स्पष्ट करेल.शहर आणि जिल्ह्यातही सेना व भाजपा कार्यकर्ते जमेल तिथे एकमेकांना भिडत असतात. त्यामुळे युती झाली असती तरीही एकमेकाकडून मदतीची अपेक्षा दोन्ही पक्षीयांना नाही.

भाजप-सेनेची ही अवस्था असताना राष्ट्रवादी व काँग्रेसची अवस्था काही वेगळी नाही. राष्ट्रवादीने आमदार अरूण काका जगताप यांची उमेदवारी ठरवली आहे. पण मागील 2 वर्षांपासून इच्छुक असलेल्या 'उमेदवार' सुजय विखे यांनी मतदारसंघात मोठमोठे सांस्कृतिक कार्यक्रम घेतले आहेत. त्यावर लाखोंचा खर्च केला आहे. तसेच आताही विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. अशोक चव्हाणही  "यावेळी आमचा उमेदवार लढू द्यावा" अशी मागणी शरद पवारांकडे मागणी करणार आहेत. एकंदरीतच अशा पद्धतीने सर्वपक्षीयांची नगर लोकसभेसाठी रस्सीखेच सुरू आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget