DNA Live24 2015

नाशिकसाठी भुजबळ साहेब?

नाशिक :
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी छगन भुजबळ यांचे नाव स्थानिक राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सुचवले आहे. भुजबळ साहेब त्यासाठी तयार नसतील तर आमचा विचार करावा असेही त्यांनी सुचवले आहे, अशी चर्चा जोरात आहे.

तूर्तास तरी भुजबळांपेक्षा माजी खासदार देविदास पिंगळे यांच्यासोबत इतर ३ पदाधिकारी लोकसभेसाठी इच्छुक आहेत. मात्र, नेमके अध्यक्ष शरद पवार साहेबांच्या मनात नाशिक लोकसभेविषयी काय चालले आहे, यावर पुढचे चित्र ठरणार आहे. पवार साहेबांच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायची इच्छा असावी म्हणून पदाधिकाऱ्यांनी हा डाव टाकला असावा अशीही शंका व्यक्त होत आहे. त्यातच भरीस भर म्हणून भुजबळ यांनीही यावर बोलायला रेड सिग्नल दिला. त्यामुळे शंकेची शक्यता होण्यात अधिकच भर पडली आहे.

निवडणूक कुठलीही असो, मागील लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव आणि त्यानंतर झालेला रणसंग्राम पाहता भुजबळांच्या पाठीमागे किती भुजांचे बळ आहे हे येणार्या निवडणुकीतच दिसेल. त्यामुळेच राज्यातील ओबीसी राजकारणाचे हे केंद्र देशाच्या राजकारणाची पुढची दिशा ठरविणार आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget