DNA Live24 2015

स्वाभिमानाची निवडणूक मोर्चेबांधणी जोरात..!

नाशिक :
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यंदा निवडणूकपूर्व मोर्चेबांधणी जोरात सुरु केली आहे. त्यानुसार गुरुवारी निफाड येथे गोदा-कादवा ऊस, कांदा, द्राक्ष परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. याद्वारे नाशिक जिल्ह्यात स्वाभिमानी निवडणुकीची हाक देत असल्याची चर्चा आहे.

कांदा, द्राक्ष व इतर पिकांसह कृषिमाल धोरण, दुधाचे भाव, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, साखर कारखाना, शेतकरी संप आदींवरून संघटनेने वारंवार आंदोलने केली. त्याद्वारे संघटनेने शेतकरी हितासाठी जोरात प्रयत्न केले आहेत. मात्र, आता एका खासदारकीवरून हा आकडा दोन आकड्यात नेण्यासाठीचे प्रयत्न संघटन करीत आहे. खासदार राजू शेट्टी, स्वाभिमानीचे प्रांताध्यक्ष डॉ. प्रकाश पोफळे यांच्यासह प्रदेश व जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी या परिषदेत पुढची धोरण मांडणार आहेत.

निफाड, रानवड कारखान्यात ऊस गाळप सुरू करावे, मागील वर्षी एफआरपीप्रमाणे राहिलेले पेमेंट मिळावे, शेतकऱ्यांना थेट कर्जपुरवठा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसींनुसार हमीभाव आदी मागण्यांचे ठराव केले जातील, अशी माहिती स्वाभिमानीचे युवा प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांनी दिली.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget