DNA Live24 2015

'नो कोशियारी, नो वोट'ची घोषणा

अहमदनगर :
कोशियारी कमिटीच्या शिफारसी लागू करण्याच्या प्रमुख मागणीसह ईपीएस 95 पेन्शनधारकांच्या विविध मागण्यांसाठी राज्य परिवहन कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ व महाराष्ट्र राज्य पेन्शनर्सच्या वतीने खासदार दिलीप गांधी यांच्या कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

तर कोशियारी कमिटीच्या शिफारशी लागू न केल्यास नो कोशियारी नो वोट ची घोषणा करण्यात आली. खा.गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय कामगार मंत्री  संतोषकुमार गंगवार, अर्थमंत्री अरुण जेटली, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना तातडीने पत्र पाठवून हे प्रश्‍न सोडविण्यासाठी त्याची भेट घेणार असल्याचे आश्‍वासन दिले.  

या आंदोलनात कॉ.आनंदराव वायकर, रमेश गवळी, एस.एस. दहीफळे, सुभाष कुलकर्णी, शिवाजी औटी, निवृत्ती मते, विष्णूपंत टकले, नवनाथ साबळे, अर्जुन बकरे, बाळासाहेब शिंदे, बलभिम कुबडे आदिंसह जिल्ह्यातील एसटी महामंडळ, वीज महामंडळ, शेती महामंडळ, साखर कामगार, विडी कामगार, वस्त्रोद्योग, हॉस्पिटल, सहकारी बँका, सोसायटी, पतसंस्था, संघ, फेडरेशन, सहकारी संस्था, एमआयडिसीचे सेवानिवृत्त कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी प्रमुख वक्त्यांनी उपस्थित पेन्शनर्सना मार्गदर्शन केले.
खा.भगतसिंह कोशियारी कमिटीच्या शिफारसी लागू कराव्यात, दरमहा कमीतकमी 7 हजार 500 रु. व निगडीत महागाई भत्ता पेन्शन मिळावी, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे प्राव्ही. फंडाचे दि.23 मार्च 2017 परिपत्रकाप्रमाणे वाढीव पेन्शन मिळावी, 31 मे 2017 चे परिपत्रक रद्द करण्यात यावे, सर्व पेन्शनर्स व त्यांच्या पत्नीस दर्जेदार मोफत आरोग्य सुविधा देण्यात यावी, कम्युटेशन, आरओसी व इतर बंद केलेल्या सवलती पुन्हा लागू करण्यात याव्या, पेन्शनरांच्या विधवा पत्नीस 100 टक्के पेन्शन देण्यात यावी, पेन्शन फंडात जमा असलेली रक्कम वारसास परत देण्यात यावी, सेवानिवृत्तीनंतर ज्यांना पेन्शन मिळत नाही त्यांची आवश्यक रक्कम घेऊन त्यांना दरमहा 5 हजार रु. पेन्शन मिळण्याच्या मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. सदर मागण्या मान्य न झाल्यास नोव्हेंबर महिन्यात अधिवेशन काळात दिल्ली येथे ऑल इंडिया एपीएस 95 कॉर्डिनेशन कमिटीच्या वतीने देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget