DNA Live24 2015

स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी भिंतीचित्रे

अहमदनगर :
स्वच्छ भारत अभियानातंर्गत स्वच्छते विषयी जनजागृतीकरीता भिंतीवर कलाकृती, सुविचार व चित्र रेखाटणारे चित्रकार निसार पठाण यांचा पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

वाडियापार्क क्रीडा संकुल येथे झालेल्या स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमात त्यांचा गौरव झाला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, महापौर सुरेखा कदम, अभय आगरकर, उपायुक्त प्रदिप पठारे, घनकचरा विभाग प्रमुख पैठणकर, मुख्य स्वछता निरीक्षक अन्वर शेख, अलिस सय्यद आदी उपस्थित होते.

महात्मा गांधी जयंती दिना निमित्त वाडियापार्क क्रीडा संकुल येथे झालेल्या कार्यक्रमासाठी चित्रकार निसार पठाण यांनी स्वच्छ भारत, सुंदर भारत हे चित्र रेखाटले असून, यामध्ये शहराच्या ऐतिहासिक वास्तुंचा समावेश आहे. पठाण यांनी यापुर्वी देखील विविध सामाजिक विषयावर भिंतीचित्र रेखाटली असून, त्यांनी कलेद्वारे आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. चित्राच्या माध्यमातून नागरिकां पर्यंन्त सामाजिक संदेश पोहचवून जनजागृतीचे कार्य ते करीत आहे. त्यांच्या या कार्याचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी कौतुक केले.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget