DNA Live24 2015

वादग्रस्त पुस्तकावर आली सरकारला जाग..!

मुंबई :
सर्व शिक्षा अभियानात वाचन साहित्य म्हणून वाटप करण्यात आलेल्या पुस्तकात वादग्रस्त मजकूर प्रसिद्ध केलेला होता. याकडे संभाजी ब्रिगेड व इतर सामाजिक संघटनांनी आवाज उठविल्यावर हे पुस्तक न वाटण्याचा आदेश काढण्याची उपरती राज्याच्या शिक्षण विभागाला सुचली आहे.

‘समर्थ श्री रामदास स्वामी’ या पुस्तकात लेखिका डॉ. शुभा साठे यांनी वादग्रस्त लिखाण केल्याचे समोर आले आहे. नागपूरमधील लाखे प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. पुस्तकातील पान नंबर १८ वर संभाजी महाराजांविषयी वादग्रस्त उल्लेख आहे. त्यामुळे राज्यात शिवप्रेमी बांधवांतून तीव्र निषेध व्यक्त होत होता. हे पुस्तक वितरित न करण्याचे पत्र सरकारी विभागाने काढले आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget