DNA Live24 2015

पंचायत राज समितीची हिवरे बाजारला भेट

अहमदनगर :
राज्याच्या पंचायतराज समितीने नुकतीच आदर्शगाव हिवरे बाजारला भेट दिली. समितीने  तपासणी बरोबरच गावात झालेल्या विविध विकास कामांची पहाणी करून माहिती घेतली तसेच ग्रामदर्शन इमारतीमधील बक्षिसे व गावाची पूर्वीची स्थिती दाखविणारी प्रदर्शनी पाहिली. 

समितीमध्ये गट प्रमुख मा.आ.विरेंद्र जगताप, मा.आ.चरण वाघमारे, मा.आ. रणधीर सावरकर, मा.आ. राहुल मोटे तसेच अधिकारी सहभागी होते. समिती सदस्यांचा सत्कार व स्वागत आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी केले. या वेळी समितीने गावक-यांसमोर राज्याच्या विविध प्रश्नांवर पोपटराव यांच्याशी चर्चा केली. श्री.पवार राज्याच्या पंचायतराज अभ्यास गटात असून त्यांच्या अभ्यासातून तयार झालेला रिपोर्ट आम्हाला पहायला आवडेल तसेच मुंबईत पंचायत राज समिती बरोबर या रिपोर्टवर चर्चा करण्याचे ठरले जेणेकरून पंचायत राज समिती व पंचायतराज अभ्यास गट यांच्या चर्चेतून राज्याच्या दृष्टीने काही हितकारक गोष्टी करता येतील त्या दृष्टीने लवकरच चर्चेचे नियोजन करू. तसेच या चर्चे दरम्यान मा.पोपटराव पवार यांनी पंचाराज समितीबरोबर काही महत्वाच्या व गरजेच्या गोष्टींवर चर्चा केली त्यात विशेष करून १४ व्या वित्त आयोगातील अडीअडचणी. सध्या ५००० लोकसंख्येच्या आतील गावाना मिळणारा निधी पुरेसा नसून सर्व शासकीय कपात होवून राहिलेल्या पैश्यात काम करणे अवघड होत आहे. म्हणून ५००० वरील लोकसंख्येच्या गावांना जो निधी दिला जातो त्याच पद्धतीने छोट्या गावांनाही मिळणे गरजेचे आहे. जेणेकरून गावांना आपल्या गरजा नुसार चांगले काम करण्याची संधी मिळेल. राज्यात कमी लोकसंख्येच्या जास्त पंचायती आहेत प्रत्येक ग्रामपंचायतीत संगणक परिचालक नियमितपणे हजर असणे आवश्यक आहे. तसेच त्यांना मिळणारा पगार दर महिन्याला नियमित झाल्यास ते ग्रामपंचायतीस पूर्ण वेळ बसतील. असे झाल्यास लोकांना कुठल्याही प्रकारचे दाखले मिळण्यास अडचण येणार नाही. सर्व ग्रामपंचायती सकाळी १० ते ५ कार्यरत असाव्यात तसेच निसर्गाची अनियमितता व दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना म्हणून प्रत्येक गावात जलसंधारण, मृदसंधारण, वनीकरणाबरोबरच स्थानिक भौगोलिक परिस्थिनुसार पाणी व पिकाचे नियोजन करणे गरजेचे आहे.

समितीमधील सदस्यांनी विविध विषयांवर चर्चा करताना शेवटी हिवरे बाजार सारखी सर्वांगीण विकासाची गावे संपूर्ण राज्यात तयार होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. समिती सदस्यांनी हिवरे बाजार मधील पाणी व पिक नियोजन, पाण्याचा ताळेबंद, आदर्शगाव, प्रशिक्षण केंद्र, सहकारी सोसाट्यानां बळकटी अश्या अनेक विषयांवर चर्चा केली तसेच राज्याच्या आदर्शगाव योजनेतून प्रत्येक मतदार संघात एक आदर्शगाव करावे अशी अपेक्षा पोपटराव यांनी व्यक्त केली. समितीतील सर्व सदस्यांनी हिवरे बाजारला भेट देवून येथील संपूर्ण कामाची माहिती घेवून असेच काम इतरही गावात करण्याचा प्रयत्न करणार असे सांगितले.    

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget