DNA Live24 2015

यंदा ५५ लाख गाठींची निर्यात शक्य


मुंबई :
बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशीच्या उत्पादनात मागील वर्षी मोठी घट आली होती. त्यामुळे यंदा राज्यासह देशभरात कपाशीखालील क्षेत्र काहीअंशी कमी झालेले आहे. तर, इतर देशातही कपाशीच्या क्षेत्रात कीड-रोगाचा प्रादुर्भाव मोठा आहे. त्यामुळे यंदा भारतीय कपाशीला जागतिक बाजारात मोठी मागणी असेल. यंदा सुमारे ५५ लाख कापूस गाठींची निर्यात शक्य असल्याचे कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडिया (सीसीआय) संस्थेने म्हटले आहे. 

शेतकरी आक्रमक झाल्याने यंदा कपाशीसह इतरही पिकांच्या हमीभावात बरीच वाढ झालेली आहे. कापसाचा दर केंद्र सरकारने यंदा ५ हजार ४५० प्रतिक्विंटल निश्चित केला आहे. मात्र, सुरुवातीच्या टप्प्यात बाजारात येणाऱ्या कापसात ओलावा असल्याने सध्या त्यास सरासरी ४४५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा भारतीय कापसाचा दर्जा चांगला राहण्याचा अंदाज आहे. त्याचवेळी भारताबाहेर कापसाला मागणी चांगली राहण्याची शक्यता आहे. बांग्लादेश, चीन आणि इतर दक्षिण आशियाई देशांमध्ये कापसाची निर्यात केली जाते. मागणी जास्त असल्याने कापसाचे भाव देखील चढेच राहणार असल्याचा अंदाज आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget