DNA Live24 2015

"उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग"

अजून उमेदवारी ठरलेली नाही, निवडणुकांच्या तारखा ठरलेल्या नाहीत... एका पक्षाने तर, महानगरपालिका निवडणूक लढवायचीच नाही असे ठरलेले असताना सुद्धा पक्षाचे चिन्ह, साहेबांचे दिशादर्शक फोटो, सोबत स्वतःचे व कुटुंबियांचे हसरे फोटो असलेले फ्लेक्स पत्रके टाकण्यास सुरुवात केली आहे. तर काही इच्छूकांचे पक्ष ठरत नाहीयेत... काहीजण पक्षप्रवेशासाठी राजस्थानी राजवड्याचे उंबरठे झिजवत आहेत. तर काहींच्या फक्त मनासारखा वार्ड मिळाला नाही म्हणून पक्ष प्रवेश रखडला आहे. काहीजण “गड्या आपुला पक्ष बरा” म्हणत पुन्हा आधीच्याच बंगल्यावर परतले आहेत. हे आहे सध्याचे नगरी राजकारण...

सोशल मिडीयावर अचानकपणे वाढलेला फोटोंचा सुळसुळाट, काहीच ठरलेले नसताना हा जोरदार प्रचार बघता एकंदरीत “उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग” ही म्हण भावी नगरसेवकांबाबतीत खरी होताना दिसत आहे.

गणपती आणि नवरात्री या सणांच्या माध्यमातून इव्हेंट करत नवाट गडी एक पाउल पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि अगदीच बोटावर मोजण्याईतके विद्यमान नगरसेवक अजूनही दिवाळीचा किराणा भरून, मतदारांचे गाऱ्हाणे ऐकून, नव्याने मतदारांना भूल देऊ अशा पारंपारिक गोष्टींवर विश्वास ठेऊन अजूनही कामाला लागलेले नाहीयेत.

त्यातच संसर्गाने होत असलेले आजारही याच काळात आलेले आहेत. त्याचाच फायदा घेत सामाजिक उपक्रमाच्या नावाखाली नेहमीचेच विविध शिबिरे घेऊन मतदारराजाला आपलेसे करण्याचा प्रयत्न करीत आहेत. स्वतः राजा होण्याची ही पध्दत जुनी असली तरी अजूनही लागू पडत असल्यामुळे ती पद्धतही राबवली जात आहे.

लेखक : विनोद सूर्यवंशी (अहमदनगर)
Labels:

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget