DNA Live24 2015

बससेवेच्या नियंत्रण कक्षाला हार घालून गांधीगिरी

अहमदनगर :
शहराची बससेवा बंद पडल्याने सर्वसामान्य नागरिकांसह विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत असताना तातडीने बससेवा सुरु करण्याच्या मागणीसाठी इंम्परियल चौकात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. तर शहर बससेवेच्या नियंत्रण कक्षाला हार घालून आंदोलकांनी गांधीगिरी केली.

या आंदोलनात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे, मयुर बांगरे, करण वाघमारे, अक्षय गायकवाड, ओंकार थोरात, अन्सार सय्यद, शहेजाद खान, लंकेश चितळकर, तुषार हंगे, अविनाश शिरसाठ, अखिलेश चव्हाण, नारायण आव्हाड, तुषार भोस, वैभव मांडे, शुभम गहिले, वैभव दळवी, प्रवीण थोरात, अंकुश चेलमेटी, अविनाश जोशी, प्रज्वल सोरटे, रितेश जोशी आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
अहमदनगर शहर बस सेवा गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. महापालिकेतील सत्ताधारी व प्रशासन ही बस सेवा सुरु करण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. नवरात्र व दिवाळीसारखे सण येऊन ठेपले असताना उपनगरातून मोठ्या प्रमाणात नागरिक शहरात खरेदीसाठी येत असतात. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा परीक्षेचा कालावधी असल्याने विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पेट्रोल व डिझेल दरवाढीमुळे खाजगी रिक्षाचालकांनी आपले दर मोठ्या प्रमाणात वाढवल्याने सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावे लागत आहे. शहर बससेवा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न बनला असून, ती त्वरीत सुरु करण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. बससेवा सुरु न झाल्यास आ.संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जनआंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget