DNA Live24 2015

यमराज अवतरले सिग्नलवर..!

अहमदनगर :
शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी प्रेमदान चौकातील सिग्नलवर साक्षात यमराज अवतरले. ट्रिपल सीट, झेब्रा क्रॉसिंगपुढे येऊन थांबणारे वाहन, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे आदी वाहतुकिचे नियम मोडून अपघाताला आमंत्रण देणार्‍या नागरिकांपुढे येऊन यमराजांनी करू नका घाई, नाहीतर खरा यमराज उभा राहील दारी... हा वाहनचालकांना संदेश दिला. 

वाहतुकीचे नियम मोडल्याने होणार्‍या अपघातात अनेक नागरिक मृत्यूमुखी पडत आहेत. हे अपघात टाळण्यासाठी सेवा सप्ताह उपक्रमांतर्गत लायन्स क्लब ऑफ अहमदनगर व शहर वाहतुक शाखेच्या वतीने वाहतुकीचे नियम पाळण्याच्या जनजागृतीसाठी मोहिम घेण्यात आली. प्रेमदान चौकात यमराजांच्या वेशभुषेत आलेल्या श्रीचंद मखीजा यांनी वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांबरोबर सेल्फी घेऊन वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले. अचानक गाडी समोर आलेले यमराज पाहून अनेक वाहनधारक गडबडले. तर यमराजांना पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. जीव हे अनमोल असून, स्वत:च्या सुरक्षिततेसाठी वाहतुक नियम पाळण्याचे आवाहन लायन्स क्लबच्या वतीने करण्यात आले. यावेळी  लायन्स क्लबचे अध्यक्ष हरजितसिंह वधवा, सचिव संदेश कटारिया, खजिनदार अंजली कुलकर्णी, प्रकल्प प्रमुख कमलेश भंडारी, आनंद बोरा, दिलीप कुलकर्णी, जसमीतसिंह वधवा, डॉ.सिमरनकौर वधवा, योगेश भंडारी, विजय कुलकर्णी, गणेश लड्डा, सुनील छाजेड, दत्ता जोगळेकर, सुमित लोढा, वाहतुक पोलीस संजय गवळी, पोपट ठोकळ, सहा.फौजदार अर्जुन कुस्कर आदी उपस्थित होते.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget