DNA Live24 2015

खरे समाधान वंचितांच्या सेवेतच : जिल्हाधिकारी द्विवेदी

अहमदनगर :
जिल्हा प्रशासनाच्या वतीने नगर तालुक्यातील दरेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या समाधान योजनेच्या कार्यक्रमात फिनिक्स सोशल फाउंडेशन व दरेवडी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरास ज्येष्ठ नागरिकांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. तसेच फिनिक्सच्या अवयव दान मोहिमेला प्रतिसाद देत 114 ग्रामस्थांनी नेत्रदान व अवयव दानाचा संकल्प केला. 

या शिबीराचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ.शिवाजी कर्डिले, अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड, प्रांत अधिकारी उज्वला गाडेकर, तहसीलदार अप्पासाहेब शिंदे, फिनिक्स फाउंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे, सरपंच अनिल करांडे, राजेंद्र आंधळे आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकात जालिंदर बोरुडे यांनी सातत्याने गरजू घटकातील दृष्टीदोष असलेल्या रुग्णांसाठी फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने शिबीर घेतले जात आहे. या शिबीरात जिल्ह्याच्या बाहेरुन देखील रुग्ण येत असून, प्रमाणिकपणे सुरु केलेली सेवा अखंडपणे चालू राहणार आहे. याचबरोबर अवयवदान जनजागृती मोहिम हाती घेण्यात आली असून, जिल्हाभर त्याचा प्रचार व प्रसार चालू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 
राहुल द्विवेदी म्हणाले की, खरे समाधान वंचितांच्या सेवेतच आहे. समाजातील शेवटच्या घटकाचा विचार करुन आपले कार्य असले पाहिजे. सामाजिक देणे या नात्याने त्यांना सहकार्य करण्याची गरज आहे. जालिंदर बोरुडे सारख्या शासकीय कर्मचार्‍याने उभे केलेले सामाजिक कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. आ.शिवाजी कर्डिले यांनी वंचित घटकांना आधार देण्याचे काम प्रत्येकाने केले पाहिजे. गरजूना केलेल्या मदतीची जाणीव असते. मागील 20 वर्षापासून फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून बोरुडे गरजू घटकातील दृष्टीदोष असलेल्यांना नवदृष्टी देण्याचे कार्य करीत आहे. सध्या सामाजिक सेवेमागे काहीतरी हेतू असतो. मात्र फिनिक्स फाऊंडेशनेचे निस्वार्थ भावनेने कार्य चालू ठेवले असून, फाऊंडेशनच्या वतीने चालू असलेल्या अवयवदान जनजागृती मोहिम काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget