DNA Live24 2015

ईकडे आड, तिकडे विहीर...

राजकारणात एकमेकांचे नातलग असण्याचे जसे फायदे असतात तसेच तोटेही असतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभेसाठी ऊमेदवारी जाहिर केल्यापासून साताराची चर्चा होती. आता त्यामधे नगरचेही नाव येऊ लागले आहे.

अहमदनगर दक्षिणमधून लोकसभेसाठी राष्ट्रवादी काॅग्रेसकडून अरूणकाका जगताप यांचे नाव फायनल झाले आहे. त्यांच्याविरूद्ध ईच्छुक ऊमेदवार सुजय विखेंचे टेंशन वाढले आहे. पण जगताप यांच्या निवडीचा विखेंपेक्षा मोठा धक्का आ. शिवाजीराव कर्डीले यांच्या गटाला बसलाय.

एका बाजूला विधानसभेसाठी मदत करणारे 'विखे' तर दुसरीकडे व्याही 'जगताप' यामुळे कर्डिलेंच्या डोक्याचा 'ताप' वाढलाय, अशीच चर्चा आहे. आता नाते जपायचे की सत्ताकारणच करायचे, हा कर्डिलेंचा निर्णय भविष्यकाळात  परिणामकारक ठरणार आहे.

या सर्व प्रकरणामधे दूसरी एक शक्यता आहे. ती म्हणजे अशी परिस्थीती येऊ शकते याची पूर्वकल्पना जर कर्डीलेंना असेल तर त्यांनी काहीतरी तोडगा नक्कीच काढला असेल.
या जर तरच्या गोष्टींमधील नेमकं काय खरं होईल हे त्यांचा निर्णयंच सांगेल.

यात अजुन एक भर पडली भाजपाने अहमदनगर महापालिका समन्वय समितीमधे कर्डिलेंचा रेड सिग्नल तर भानुदास बेरडांना ग्रीन सिग्नल दिला. ही सर्व परिस्थिती बघता "ईकडे अन तिकडे विहीर" हीच कर्डिले समर्थकांची अवस्था झाली आहे.

(लेखक : विनोद सूर्यवंशी)

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget